स्टेशनवर आंघोळ पडली महागात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 12:02 AM2016-05-26T00:02:33+5:302016-05-26T00:06:36+5:30

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुकूनही पाण्याची नासाडी केली तर दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे. त्यातही जर चक्क आंघोळ केली तर त्यासाठी थेट पाचशे रुपये मोजावे लागतील.

At the station washed in the water ... | स्टेशनवर आंघोळ पडली महागात...

स्टेशनवर आंघोळ पडली महागात...

googlenewsNext

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुकूनही पाण्याची नासाडी केली तर दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे. त्यातही जर चक्क आंघोळ केली तर त्यासाठी थेट पाचशे रुपये मोजावे लागतील. याचाच प्रत्यय पर्यटन आणि देवदर्शनासाठी आलेल्या ४० प्रवाशांना बुधवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आला.
पर्यटन आणि देवदर्शनासाठी रेल्वेच्या विशेष बोगीने बुधवारी सकाळी ४० प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले होते. रेल्वेस्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी रेल्वे रुळाजवळ पाईपलाईन आहे. सकाळची वेळ असल्याने यातील प्रवाशांनी थेट प्लॅटफॉर्मवरच आंघोळ करणे सुरू केले. काही जणांनी प्लॅटफॉर्मवरच कपडे धुण्यास सुरुवात केली. पाहता पाहता प्लॅटफॉर्म सांडपाण्याने भरून गेला. प्रवाशांनी कपडे धुतल्यानंतर ते वाळविण्यासाठी प्लॅटफॉर्मवरच टाकले होते. त्यामुळे रेल्वेस्टेशनला धोबी घाटाचे स्वरूप आले होते. हा प्रकार स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या कानी पडला. त्यांनी तात्काळ धाव घेतली. तीव्र पाणीटंचाई असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी केली जात असल्याबद्दल त्यांनी प्रवाशांना चांगलेच सुनावले. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आंघोळ करून पाण्याची नासाडी केल्याप्रकरणी प्रत्येकी ५०० याप्रमाणे ४० जणांकडून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वेला पैसे मोजून प्रवासासाठी निघालो होतो. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर काहीही करता येते, असाच या प्रवाशांचा समज होता.

दंडाची कल्पना असती तर हॉटेल, लॉजमध्ये गेलो असतो. तेथे कमी रक्कम लागली असती, असे काही प्रवाशांनी म्हटले.

Web Title: At the station washed in the water ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.