तब्येत सांभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:02 AM2021-08-27T04:02:57+5:302021-08-27T04:02:57+5:30
औरंगाबाद : राज्यात आता जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थांबला असून, अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम ...
औरंगाबाद : राज्यात आता जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थांबला असून, अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
आकडेवारी काय सांगते
महिना...........,अपेक्षित पाऊस.......... झालेला पाऊस.... किमान तापमान...... कमाल तापमान
जून................३२० मि.मी.................४६५ मि.मी.........२२ सेल्शिअस.............३३
जुलै................१८६ मि.मी. ........... २६५ मि.मी. ..२१.३...........................३०.३
ऑगस्ट ......१६२ मि.मी.................१२१ मि.मी.........२१.९................३०.५
............................................................................
ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस
ऑगस्टमध्ये मराठवाड्यात पाऊस कमीच असतो. औरंगाबाद जिल्ह्यात २०१९ साली या महिन्यात सरासरी ८४ टक्के पाऊस पडला, तर २०२० मध्ये ८९ टक्के पाऊस पडला. २०२१ च्या ऑगस्टमध्ये आतापर्यंत ७५ टक्के पाऊस पडला आहे. २ ऑगस्टपासून पाऊस थांबला होता. तो पुन्हा १७ ऑगस्टपासून सुरू झाला. २१ ऑगस्टपासून पुन्हा पाऊस थांबला आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये पाऊस बऱ्यापैकी खंड घेतोच.
......................................................................................................
कोठे किती पाणीसाठा... औरंगाबाद जिल्ह्याची आकडेवारी,
प्रकल्प........ संख्या.......... पाणीसाठा
लघु प्रकल्प...९६............ २० टक्के
मध्यम प्रकल्प...१६.......२१ टक्के
मोठे प्रकल्प....१.........४१ टक्के
..............................................................
वातावरण बदलले, काळजी घ्या
वातावरण बदलल्यामुळे आणि तापमान वाढल्याने आजारही बळावत आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये ताप येणे, सर्दी - खोकला होणे व तो छातीत उतरणे, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, हे प्रकार वाढले आहेत. दररोज माझ्या ओपीडीत येणाऱ्या २५ लहान मुलांपैकी २० मुुले या आजाराने त्रस्त असलेली आढळून येत आहेत. रात्री खोकला येणे, घशात खरखर वाढणे ही लक्षणे पण आहेत. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांमध्येसुद्धा वातावरण बदलल्यामुळे सर्दी- ताप यासारखे आजार वाढलेले आहेत. हा फ्लूचा न्यूमोनियासारखा व्हायरस आहे. आजूबाजूला ज्यांना कुणाला सर्दी - ताप असेल त्यांच्यापासून दूर राहणे, लहान मुलांना ताप आल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेणे आवश्यक आहे.
-डॉ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ, औरंगाबाद