शटर उचकटून कापड दुकानात चोरी

By Admin | Published: August 11, 2014 12:27 AM2014-08-11T00:27:43+5:302014-08-11T00:32:18+5:30

कन्नड : येथील बसस्थानकाजवळ असलेल्या राजधानी कलेक्शन या कापड दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी रोख २७ हजार चोरून नेले.

Steal the shutter by stitching the shutter | शटर उचकटून कापड दुकानात चोरी

शटर उचकटून कापड दुकानात चोरी

googlenewsNext

कन्नड : येथील बसस्थानकाजवळ असलेल्या राजधानी कलेक्शन या कापड दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी रोख २७ हजार चोरून नेले. ही घटना शनिवारी रात्री अडीच ते साडेतीन वाजेदरम्यान घडली.
राजधानी कलेक्शन या दुकानाला समोरील पूर्व बाजूने व पाठीमागील पश्चिम दिशेने शटर बसविलेले आहे. चोरट्यांनी पश्चिम दिशेकडील शटर उचकटवले; मात्र शटरच्या आतून लोखंडी दरवाजा असल्याने त्यांनी समोरील बाजूचे शटर उचकटवले. तत्पूर्वी बाहेरील जागेत बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कॅमेरा फिरल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दुकानात प्रवेश केला.
चोरट्यांनी फक्त रोख रक्कम २७ हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार नेमीनाथ जैन यांनी कन्नड पोलीस ठाण्यात दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार अशोक तुपे करीत आहेत.
दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरा फोडतानाचे फुटेज पोलिसांनी घेतले आहे. शहरापासून जवळच कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील भवानी पॅलेस या बीअर बारच्या हॉटेलचे शटरही उचकटविण्यात आले; तथापि या ठिकाणाहून काहीही माल चोरीस गेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Steal the shutter by stitching the shutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.