सव्वातीन लाखांच्या दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:55 AM2017-10-17T01:55:57+5:302017-10-17T01:55:57+5:30

दुचाकींची चोरी करून विकणाºया दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन लाख ३० हजार रुपये किमतीच्या तेरा दुचाकी जप्त केल्या आहेत

Stolen bikes seized | सव्वातीन लाखांच्या दुचाकी जप्त

सव्वातीन लाखांच्या दुचाकी जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुचाकींची चोरी करून विकणाºया दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन लाख ३० हजार रुपये किमतीच्या तेरा दुचाकी जप्त केल्या आहेत. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे लखन नारायण आढे व विलास उर्फ पिन्या गुणाजी आढे (रा. परतवाडी तांडा. ता. परतूर, जि. जालना) अशी आहेत. जालना शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून दोघेही दुचाकींची चोरी करत असल्याची गुप्त माहिती विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार कृती दलाच्या पथकाने परतवाडी तांड्याहून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी जालना शहर, आष्टी तसेच अन्य ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच अन्य दोघांनी चोरलेल्या दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने घेतल्याचे सांगितले. या प्रकरणात सहभागी असणा-या इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.
यापूर्वी चोरीच्या दुचाकी कुणाला विक्री केल्या, याचाही तपास पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव , एम. बी. स्कॉट, रामप्रसांद रंगे, संदीप चिंचोले, राजू पवार, कृष्णा देठे, संदीप भोसले, भालचंद्र गिरी, अनिल राठोड यांनी ही कारवाई केली.

Web Title: Stolen bikes seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.