टमटम चोरी; दोघांना उचलले
By Admin | Published: July 28, 2016 12:35 AM2016-07-28T00:35:41+5:302016-07-28T00:55:30+5:30
लातूर : शहरासह परिसरातील गावातील टमटमची रात्रीच्या वेळी चोरी करुन ते पुण्यात अवैध प्रवासी वाहतुकीसाठी विकणाऱ्या टोळीतील दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
लातूर : शहरासह परिसरातील गावातील टमटमची रात्रीच्या वेळी चोरी करुन ते पुण्यात अवैध प्रवासी वाहतुकीसाठी विकणाऱ्या टोळीतील दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून तीन टमटमसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
लातूर शहरासह परिसरातील गावात घरासमोर पार्किंग करण्यात आलेल्या टमटमवर डोळा ठेवून, रात्रीच्यावेळी त्याची चोरी करणारी टोळी सक्रिय होती. दरम्यान, चिंचोली बल्लाळनाथ येथील टमटम चोरी गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात २४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी या टोळीचा तपास सुरु केला. चिंचोली बल्लाळनाथ येथील इसूफ दस्तगीर शेख (२७) हा या टोळीत प्रमुख असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने पुणे शहर गाठले. अलेगाव गावठाण (ता. हवेली जि. पुणे) येथील बाळासाहेब राजाराम कोंढरे (३०) याच्यासोबतीने तो चोरीतील टमटम पुण्यात अवैध प्रवासी वाहतुकीसाठी विकायचा. पोलिस पथकाने या दोघांनाही पुण्यातून तीन टमटमसह अटक केली आहे.