स्टोन क्रेशरचालकांनी तोडले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:34 AM2017-07-18T00:34:37+5:302017-07-18T00:39:35+5:30

नांदेड: स्टोन के्रशर चालकाकडे असलेल्या थकित वसुलीबाबत तहसील कार्यालयाने गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करताच

Stone crushers break seals | स्टोन क्रेशरचालकांनी तोडले सील

स्टोन क्रेशरचालकांनी तोडले सील

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: स्टोन के्रशर चालकाकडे असलेल्या थकित वसुलीबाबत तहसील कार्यालयाने गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करताच, त्यामुळे संबंधित स्टोन क्रेशरधारकाने बंधपत्र लिहून देत तहसील कार्यालयाकडे पंधरा लाख रुपयांचा भरणा केला़
नांदेड तहसील कार्यालयाअंतर्गत १६ स्टोनक्रेशर आहेत़ त्यापैकी ६ स्टोन क्रेशरचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे़ त्यापैकी दोन क्रेशर हे कायमस्वरुपी बंद असून आठ स्टोन क्रेशरधारकांकडे वसुली प्रलंबित आहे़ हे स्टोनक्रेशर २०१३ पासून बंद असून २०१६ मध्ये प्रलंबित वसुलीमुळे महसूल कार्यालयाने क्रेशरला सील ठोकले होते़ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या आदेशानंतर या प्रकरणात उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी बाभूळगाव व गुंडेगाव परिसरातील स्टोन क्रेशरची पाहणी केली़ त्यावेळी स्टोनक्रेशर चालकाने महसूलने लावलेले सील तोडून क्रेशर सुरु केल्याची बाब समोर आली़ त्यामुळे या स्टोन क्रेशरचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची तयारी मंडळ अधिकारी वसरणी व तुप्पा यांनी केली होती़
त्याचवेळी के्रशरचालकांनी प्रलंबित वसुली भरण्यास सहमती दर्शविली़ जे़ आऱ स्टोन क्रेशर गट क्रमांक २३० मौजे तुप्पा यांच्याकडे ११ लाख ६५ हजार ६३४ रुपये, माऊली स्टोनक्रेशर गट क्रमांक १६३ बाभूळगावकडे १२ लाख ३६ हजार, फ्रेन्डस स्टोनक्रेशर गट क्रमांक ३५० काकांडी- १६ लाख १३ हजार ३३३, गिरीराज स्टोनक्रेशर गट क्रमांक १९४ बाभूळगांव-२६ लाख ६० हजार ६६७, उज्वल स्टोनके्रशर गट क्रमांक ९८ बाभूळगाव यांच्याकडे २ लाख ६ हजार रुपयांची थकबाकी होती़
या स्टोनक्रेशरधारकांकडे थकबाकी असताना त्यांनी सील तोडून पुन्हा क्रेशर सुरु केले होते़ याबाबत तहसील कार्यालयाला त्यांनी बंधपत्र लिहून दिले असून प्रत्येकी ३ लाख ६ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे़ त्यामुळे प्रलंबित वसुलीपैकी १५ लाखांची वसुली झाली आहे़

Web Title: Stone crushers break seals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.