जरंडीत दगडफेक; सात जणांवर दंगलीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:05 AM2021-01-17T04:05:06+5:302021-01-17T04:05:06+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडी जुना तांडा येथील इसा आझम तडवी यांचा मुलगा युनुस व त्याची पत्नी आशाबाई युनुस तडवी ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडी जुना तांडा येथील इसा आझम तडवी यांचा मुलगा युनुस व त्याची पत्नी आशाबाई युनुस तडवी या पती-पत्नीमध्ये वाद झाला. या कारणावरून त्याच्या सासरकडील नातेवाईकांनी इसा तडवी यांच्या घरावर दगडफेक करीत लाठ्या काठ्यांनी कुटुंबीयांवर हल्ला केला. या मारहाणीत इसा तडवी(४५), सांडू तडवी(२५) आणि बारक्या ऊर्फ मनोज तडवी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सोयगावचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. जखमींना उपचारासाठी जळगाव जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी इसा तडवी यांच्या तक्रारीवरून निंबायती येथील शाहरुख तडवी, जलाल तडवी, जाकेराबाई तडवी, जहीर तडवी, शाकीर ऊर्फ भुऱ्या तडवी, साहिल तडवी या सहा जणांसह आशाबाई तडवी यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार संतोष पाईकराव, शिवदास गोपाळ, संदीप चव्हाण, अविनाश बनसोडे हे पुढील तपास करीत आहेत.
फोटो : लाठ्याकाठ्यांनी मारहाणीत जखमी झालेले इसा तडवी.