औंढ्यात आज काँग्रेसचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:38 AM2017-09-13T00:38:45+5:302017-09-13T00:38:45+5:30
राज्य सरकारने शेतकºयांविषयी घेण्यात आलेले निर्णय संपूर्ण चुकीचे असून शासनाने सर्व व्यापारी, नागरिकांना वेठीस धरले आहे. शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने पिंपळदरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ. संतोष टारफे यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : राज्य सरकारने शेतकºयांविषयी घेण्यात आलेले निर्णय संपूर्ण चुकीचे असून शासनाने सर्व व्यापारी, नागरिकांना वेठीस धरले आहे. शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने पिंपळदरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ. संतोष टारफे यांनी दिली आहे.
राज्य शासनाने मागील तीन वर्षांत तुघलकी कारभार करून शेतकरी, कामगार, व्यापारी, कर्मचारी तथा सर्व स्तरातील जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे नोटबंदी, शेतकरी पीकविमा शेतकºयांची फसवी कर्जमाफी, शालेय गणवेश वाटप अशा विविध योजनांमध्ये दिशाभूल केली आहे. या विरूद्ध शासनाला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, माजी जि.प.सदस्य अॅड.बाबा नाईक, तालुकाध्यक्ष माणिकराव पाटील, रमेश जाधव, शंकर शेळके, नगरसेवक सुमेध मुळे, बाळासाहेब देशमुख, मारोती बेले, विजय काचगुंडे, सुधीर राठोड, माणिकराव कर्डिले, नंदकुमार पाटील, नामदेव लव्हेकर, जियायोद्दीन इनामदार आदी हजर होते.