वाळूजच्या कंपनीचे प्रदूषण थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 09:04 PM2018-12-01T21:04:19+5:302018-12-01T21:05:29+5:30
वाळूज महानगर : वाळूज लगत असलेल्या गरवारे कंपनीच्या बॉयलरमधून मोठ्या प्रमाणात धूर व काजळी बाहरे पडत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषण थांबवून कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी वाळूज ग्रामपंचायत सदस्यांनी शनिवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे केली.

वाळूज गावालगत गरवारे पॉलिस्टर कंपनी आहे. कंपनीने काही वर्षांपूर्वी वाळूज-कमळापूर रस्त्यावर नागरी वसाहतीलगतच कंपनीच्या बाजूने बॉयलर उभारला आहे. बॉयलरच्या चिमणीमधून मोठ्या प्रमाणात धूर व काजळी बाहेर पडत असल्याने प्रदूषण होत आहे. काही दिवसांपासून धूर व काजळी शिवाजीनगर, समता कॉलनी, अविनाश कॉलनी, गंगा कॉलनीतील नागरिकांच्या घरावर पडत असून, छतावर थर साचत आहेत. काजळीमुळे नागरिकांच्या घराच्या भिंती काळवंडल्या असून, वाळू घातलेले कपडे काळे पडत आहेत.
धुराचे लोळ हवेत मिसळत असल्याने प्रदूषण होत असून, नागरिकांना श्वासनाचा त्रास होत आहे. तर दुसरीकडे पाणीही दूषित होत आहे. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. धूर व काजळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कंपनीच्या बॉयलरची चिमणी बंद करुन होणारे प्रदूषण थांबविण्यात यावे व संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी वाळूजचे ग्रा.पं. सदस्य सचिन काकडे व रविंद्र मनगटे यांनी शनिवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.