नायगाव येथील विहिरीचे काम बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 09:38 PM2019-05-14T21:38:47+5:302019-05-14T21:39:09+5:30
पैठणखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत नायगाव शिवारातील गट क्र. ८ मध्ये एच.एम कंपनीत अनधिकृत विहिरीचे काम सुरू असून, ब्लास्टिंगमुळे जवळील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विहिरीचे काम थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चितेगाव : पैठणखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत नायगाव शिवारातील गट क्र. ८ मध्ये एच.एम कंपनीत अनधिकृत विहिरीचे काम सुरू असून, ब्लास्टिंगमुळे जवळील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विहिरीचे काम थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नायगाव शिवारात एच.एम.कंपनी परिसरात खोदकाम सुरू असलेल्या विहिरीपासून दोनशे फुटांवर दगडीखाण असून, येथून गावातील नागरिक पाण्याचा वापर करत आहे. तर जनावरांना याच ठिकाणी तहान भागवावी लागते. नुकतेच कंपनीने घेत असलेल्या विहिरीमुळे या खदाणीतील पाणी झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. विहिरी परिसरात लोकवस्ती असून खोदकाम व ब्लास्टिंग दरम्यान जवळील घरांना धोका निर्माण झाला आहे.
पैठणखेडा ग्रामपंचायतीने सदरील काम बंद करण्याच्या मागणीचे निवेदन पैठणचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. यावर उपसरपंच मंजू राघुर्डे, माजी सरपंच भानुदास गायकवाड, ज्ञानेश्वर राघुर्डे, रमेश गायकवाड, मच्छिंद्र महाजन, सतीश राघुर्डे, उत्तम गायकवाड आदी ग्रामस्थांच्या सह्या आहे.