घाटी, कर्करोग रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:52 PM2018-11-22T23:52:16+5:302018-11-22T23:52:34+5:30

औरंगाबाद : घाटी रुग्णालयासह शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाºयांनी किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी काम बंद आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे दोन्ही ठिकाणी स्वच्छतेच्या कामांवर परिणाम झाल्याने अन्य कर्मचाºयांची मदत घेण्यात आली.

Stop the work of contractors contract workers in the Valley, Cancer Hospital | घाटी, कर्करोग रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

घाटी, कर्करोग रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णालयासह शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाºयांनी किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी काम बंद आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे दोन्ही ठिकाणी स्वच्छतेच्या कामांवर परिणाम झाल्याने अन्य कर्मचाºयांची मदत घेण्यात आली.


साफसफाईच्या कामासाठी घाटी रुग्णालयात ४६ तर शासकीय कर्करोग रुग्णालयात ५० कंत्राटी कर्मचारी घेण्यात आलेले आहेत. कंत्राटदाराने या कर्मचाºयांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे आवश्यक आहे. १३ हजार रुपये वेतन असताना प्रत्यक्षात ५ हजार रुपयेच कंत्राटदारांकडून दिले जात असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किमान वेतन देण्याची मागणी कर्मचाºयांकडून कंत्राटदारांकडे केली जात आहे. परंतु त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने अखेर गुरुवारी कं त्राटी कर्मचाºयांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग निवडला.


शासकीय कर्करोग रुग्णालयात सकाळीच कंत्राटी कर्मचाºयांनी प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. घाटीत सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत २९ कर्मचारी काम करतात. कर्करोग रुग्णालयातील कर्मचाºयांपाठोपाठ घाटीतील हे सर्व कंत्राटी कर्मचारी सकाळी तासभर काम करून अचानक गैरहजर राहिले. कामगारांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी अधिष्ठातांच्या कक्षात बैठक घेण्यात आली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांची बैठकीला उपस्थिती होती. यावेळी कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी कर्मचाºयांच्या मागण्या मांडल्या आणि कंत्राटी कामगारांना किमान वेतन न देणाºया ठेकेदारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.


कंत्राटदाराला नोटीस
क र्करोग रुग्णालयात साफसफाईच्या कामावर परिणाम होऊ नये, यासाठी अन्य कर्मचारी देण्यात आले. शहराबाहेर असलेल्या एक्झिमियस मॅनेजमेंट प्रा. लि. या कंत्राटदारास २४ तासांत हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. यासंदर्भात कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून, समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर संबंधित कंत्राटदारास ब्लॅकलिस्ट केले जाईल, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
 

Web Title: Stop the work of contractors contract workers in the Valley, Cancer Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.