अनुकंपा भरतीत अजब निर्णय; जिल्हा परिषदेचे नवे शिपाई बीई, एमबीए, एम.एस्सी, एम. कॉम. झालेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 02:16 PM2022-01-07T14:16:07+5:302022-01-07T14:18:42+5:30

अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांची वर्ग क अथवा ड पदावर निवड करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

Strange decision in compassionate recruitment, new peon of Zilla Parishad Aurangabad is BE, MBA, M.Sc, M. Com. qualified ! | अनुकंपा भरतीत अजब निर्णय; जिल्हा परिषदेचे नवे शिपाई बीई, एमबीए, एम.एस्सी, एम. कॉम. झालेले !

अनुकंपा भरतीत अजब निर्णय; जिल्हा परिषदेचे नवे शिपाई बीई, एमबीए, एम.एस्सी, एम. कॉम. झालेले !

googlenewsNext

औरंगाबाद : वर्ग 'क' ची शेकडो पदे रिक्त असताना जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची भरती प्रक्रिया राबविताना उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेचा विचार न करता त्यांची सरसकट शिपाई पदावर निवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या निवड यादीतील १५ जण बी.ई, बी.एस्सी., एम.एस्सी., बी.ए.बी.एड, बी.कॉमसह टायपिंग परीक्षा उत्तीर्ण आहेत. या उमेदवारांची शासन निर्णयानुसार वर्ग 'क' मधील लिपिकासह अन्य पदावर निवड करणे अपेक्षित होते.

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याच्या सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग 'क' अथवा 'ड' पदावर अनुकंपा तत्त्वावर तात्काळ सेवेत घेण्याची तरतूद आहे. संबंधित कर्मचारी मरण पावल्यानंतर पाच वर्षांत अर्ज करावा लागतो. अशा प्रकारे सुमारे १८० जणांची प्रतीक्षा यादी जि. प.कडे आहे. एकूण रिक्त पदाच्या दहा टक्के पदे अनुकंपाधारकातून भरण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. ही प्रक्रिया नुकतीच झाली. अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांची वर्ग क अथवा ड पदावर निवड करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. प्रशासनाने मात्र अनुकंपाधारकांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता सरसकट परिचर पदावर निवड केली. ही निवड यादी जि. प.च्या संकेतस्थळावर ५ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली. यात १५ जण बी.ई., एम.एस्सी., बी.ए., बीएड, एम.ए. एम.कॉम.,एम.बी.ए., असे पदवीधर आणि टायपरायटिंग, एमएससी सीआयटी परीक्षा उत्तीर्ण आहेत. हे उमेदवार लिपिक पदाची पात्रता धारण करतात. मात्र त्यांना थेट शिपाई करण्यात आले.

हा तर अनुकंपाधारकांचा अवमान
अनुकंपाधारकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग क अथवा ड पदी निवड करण्याचा शासनाचा आणि औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे. प्रशासनाने ही भरती प्रक्रिया राबविताना उच्चशिक्षित उमेदवारांची शिपाईपदी निवड करून त्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा अवमान केला. प्रशासनाने तातडीने सुधारित यादी जाहीर करावी.
- मोनाली राठोड, समाजकल्याण सभापती.

Web Title: Strange decision in compassionate recruitment, new peon of Zilla Parishad Aurangabad is BE, MBA, M.Sc, M. Com. qualified !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.