महामार्गावरील पथदिवे आठ-आठ दिवस राहतात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:06 AM2021-05-20T04:06:10+5:302021-05-20T04:06:10+5:30
गल्ले बोरगाव येथील देवगाव फाटा व टाकळी फाटा येथील चौफुलीवर महामार्गावर असलेल्या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे ...
गल्ले बोरगाव येथील देवगाव फाटा व टाकळी फाटा येथील चौफुलीवर महामार्गावर असलेल्या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस उजळून निघालेला महामार्ग सध्या अंधारातच असल्याचे दिसून येत आहे. याच अंतरात अखेर अनेक भीषण अपघात झालेले आहेत. त्यापैकी बहुतांश अपघात हे रस्ता ओलांडताना झालेले आहेत. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना पथदिवे चालू असल्यामुळे त्रास जाणवत नव्हता. मात्र, आता काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्याकारणाने रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता वाढतच आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याकडे विशेष लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे त्वरित चालू करावेत व या पथदिव्यांची देखभाल वेळच्या वेळी नियमितपणे करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
फोटो : गल्ले बोरगाव येथील देवगाव फाटा व टाकळी फाटा महामार्गावर असलेले बहुतांश पथदिवे बंद आहेत.
190521\img_20210519_154321.jpg
महामार्गावरील पथदिवे एक दिवस चालू तर आठ दिवस बंद