आहाराच्या नियोजनाने द्या हाडांना बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:05 AM2021-03-16T04:05:06+5:302021-03-16T04:05:06+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त सिडको- हडको माहेश्वरी मंडळातर्फे हाडांची ठिसूळता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा बाहेती ...

Strengthen bones with diet planning | आहाराच्या नियोजनाने द्या हाडांना बळकटी

आहाराच्या नियोजनाने द्या हाडांना बळकटी

googlenewsNext

जागतिक महिला दिनानिमित्त सिडको- हडको माहेश्वरी मंडळातर्फे हाडांची ठिसूळता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती. पस्तिशीनंतर हाडांच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागतात. याकडे दुर्लक्ष केल्यास हाडांची ठिसूळता अधिकाधिक वाढत जाते. त्यामुळे या समस्येकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, असे डॉक्टरांनी सुचविले. हाडांची झीज न होऊ देण्यासाठी पंचकर्म कसे उपयुक्त ठरते, याविषयी डॉ. अपर्णा जाधव यांनी मार्गदर्शन केले. नाचणी, जवस, तीळ, कडधान्ये, दूध, पनीर यांचे योग्य सेवन केल्यास शरीराला पूरक प्रमाणात कॅल्शियम मिळू शकते, असे डॉ. पद्मा तोष्णीवाल यांनी सांगितले. डॉ. ज्योती भाला यांनी प्रास्ताविक केले. प्रीती झंवर यांनी आभार मानले. मधू करवा, अनुराधा मुंदडा, प्रतिमा मंत्री, पल्लवी कोठारी, डॉ. आकांक्षा पेशकर, अश्विनी देशमुख, श्वेता शहा यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Strengthen bones with diet planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.