ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई
By Admin | Published: July 29, 2015 12:17 AM2015-07-29T00:17:20+5:302015-07-29T00:50:23+5:30
बीड : ध्वनी प्रदूषण, रस्त्यावर विनापरवाना तात्पुरत्या स्वरूपातील मंडप उभारणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल
बीड : ध्वनी प्रदूषण, रस्त्यावर विनापरवाना तात्पुरत्या स्वरूपातील मंडप उभारणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, पुरवठा अधिकारी भाऊसाहेब जाधव यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व पोलीस प्रशासनाने ध्वनी प्रदुषणाविषयीच्या तरतुदींची काटेकोर पालन करावे, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या तक्रारी नोंदवून घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पोलीस विभागाचा १०० हा टोल फ्री क्रमांक निश्चित केल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नागरी क्षेत्र वगळता घोषित करण्यात आलेल्या शांतता क्षेत्राची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शांतता क्षेत्राची माहिती नगरपालिकांतर्फे देण्यात येणार आहे. पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांना ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची अधिसूचनाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)