विद्यापीठ परिसरात कडक नियम; विनापरवानगी फोटो, शूटिंग करणाऱ्यांना २ हजारांचा दंड

By योगेश पायघन | Published: January 3, 2023 12:13 PM2023-01-03T12:13:34+5:302023-01-03T12:14:40+5:30

विद्यापीठ सुरक्षा समितीची बैठक: १८ निर्णयांच्या अंमलबजावणीला सुरुवात

Strict rules in Dr.BAMU premises; 2,000 fine for those shooting photos without permission | विद्यापीठ परिसरात कडक नियम; विनापरवानगी फोटो, शूटिंग करणाऱ्यांना २ हजारांचा दंड

विद्यापीठ परिसरात कडक नियम; विनापरवानगी फोटो, शूटिंग करणाऱ्यांना २ हजारांचा दंड

googlenewsNext

औरंगाबाद : विद्यापीठात वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रति तासावर नसेल, याकडे सुरक्षा रक्षकांनी लक्ष द्यावे. प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग केल्यास २ हजार रु. दंड आणि विद्यापीठ परिसरात वाहन शिकवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आढळून आल्यास ३ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच विनापरवानगी उपोषण, आंदोलन, मोर्चे काढता येणार नसल्याचा निर्णय विद्यापीठाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात सात सदस्सीय बैठक पार पडली. यात १८ निर्णय घेण्यात आले. समिती अध्यक्ष कुलसचिव भगवान साखळे, सचिव उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे, डॉ. मुस्तजीब खान, डाॅ. कैलास पाथ्रीकर, डाॅ. पुरषोत्तम देशमुख व सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनास पूर्वपरवानगी लागेल. उपोषण, मोर्चे आंदोलनाला पोलिसांची परवानगी बंधनकारक राहील. कुलगुरू कार्यालयात आंदोलकांना परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे ठरले. आंदोलनांच्या परवानगीसाठी कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. परिसरातील फुले तोडण्यास मनाई करण्यात आली. मोकाट जनावरांचा बंदोबस्त. विद्यापीठ प्रवेशद्वारापासून ते विधी विभागापर्यंत मुख्य रस्त्यावर गरजेनुसार गतिरोधक, बारा ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात झाल्याचे कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी सांगितले.

हे आहेत निर्णय: 
-वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रति तास राहील याकडे लक्ष देणे
-हाॅर्न प्रतिबंध, धूम्रपानावर बंदी पालनाकडे लक्ष देणे, फलक लावणे
-विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग २ हजार दंड
-अनुचित प्रकार, दुर्घटना, मदतीवेळी संपर्कासाठी सुरक्षा रक्षकांचा संपर्क क्रमांक फलक लावणे
-परिसरात वाहन चालवणे शिकण्यास प्रतिबंध, ३ हजार दंड
-स्नेक कॅचरची व्यवस्था व सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक दर्शनी ठिकाणी लावणे
-कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सुरक्षारक्षकांना बायोमॅट्रिक हजेरी, ड्रेसकोड, ओळखपत्र बंधनकारक
-सकाळी ६ ते ९ पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाहनांना विद्यापीठ गेटवर डाव्या बाजूने वाहनतळ करणे.

Web Title: Strict rules in Dr.BAMU premises; 2,000 fine for those shooting photos without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.