छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात परिचारिकांचे कामबंद आंदोलन
By संतोष हिरेमठ | Published: May 2, 2024 11:17 AM2024-05-02T11:17:56+5:302024-05-02T11:18:21+5:30
रुग्णालयातील पायाभूत सुविधांसाठी परिचारिकांचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी गुरुवारी सकाळी कामबंद आंदोलन सुरू केले. घाटीतील सीव्हीटीएस इमारतीत शस्त्रक्रियागृह न सुरू करण्याच्या मागणीसाठी आणि तोडफोड करून पार्किंगच्या जागेत कक्ष उभारल्याविरुद्ध परिचारिकांनी हे कामबंद आंदोलन सुरू केले.
सीव्हीटीएस इमारतीत तोडफोड करून पार्किंगमध्ये कक्ष तयार करण्यात आला. या ठिकाणी दोन कक्ष स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मंजूर केलेले नाही. या शस्त्रक्रियागृहामध्ये कुठल्याही सुविधा नाहीत. त्याचे नूतनीकरणही बांधकाम विभागाने केलेले नाही, असे परिचारिकांनी नमूद केले. दोन तासांनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी शासकीय परिचारिका संघटनेच्या सचिव इंदुमती थोरात, महेंद्र साळवे, कालिंदी इधाटे, वंदना कोळणूरकर, प्रतिभा अंधारे , नवाज सय्यद आदी उपस्थित होते.