वाहक -चालकांना एसटीचा झटका
By Admin | Published: June 28, 2014 11:42 PM2014-06-28T23:42:35+5:302014-06-29T00:37:10+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १० जानेवारी २०१३ पासून मार्गावरील चालक, वाहक व मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली.
बाळासाहेब जाधव , लातूर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १० जानेवारी २०१३ पासून मार्गावरील चालक, वाहक व मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील ३० कर्मचाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही लातूर विभागीय कार्यालयाचे नियंत्रक ड़ीबी़माने यांच्या उपस्थितीत करण्यात आली़
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जानेवारी २०१४ पासून मार्गावरील चालक ांना, मार्ग तपासणी पथकातील चालक पर्यवेक्षकांना कर्तव्यावर असतांना मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे़यामुळे कर्तव्यात कसूर व अपहाराच्या घटनांना आळा बसविण्यास मोठी मदत होणार आहे़ही दूरदृष्टीता लक्षात घेवून वाहतूक व सुरक्षा दक्षता खाते यांच्या अधिकाऱ्यांच्या तीन संयुक्त समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत़ यामध्ये लातूर विभागाचे विभागीय नियंत्रक डी़बी़माने यांच्या उपस्थितीत समितीने दंडात्मक कार्यवाहीची मोहीम सुरू केली आहे़
यामध्ये जानेवारी ते जुन कालावधीत गाड्या चेक करून मोबाईलची जप्ती करणे, पहिल्या टप्प्यात १००रू दंड, दुसऱ्या टप्प्यात ५००रू, तिसऱ्या टप्प्यात मोबाईल वापरताना आढळल्यास मोबाईल जप्ती करण्याची प्रक्रिया सुरू या मोहिमेला चालू महिन्यात गती मिळाली असून सध्यापर्यंत ३० मोबाईलधारक वाहक -चालकांवर कारवाई करण्यात आली आहे़