परिचारिकांचा संप,घाटीत रुग्णसेवेला फटका;शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 11:37 AM2022-02-23T11:37:29+5:302022-02-23T11:38:58+5:30

संपाच्या पार्श्वभूमीवर नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे.

Strike of nurses effects treatments in ghati hospital; surgery postponed | परिचारिकांचा संप,घाटीत रुग्णसेवेला फटका;शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

परिचारिकांचा संप,घाटीत रुग्णसेवेला फटका;शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

googlenewsNext

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी)  परिचारिका दोन दिवशीय संपात सहभागी झाल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. संपामुळेच नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विविध मागण्यांसाठी बुधवारी घाटीत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर  नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. तसेच अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत.त्यामुळे साफसफाईच्या कामावर परिणाम झाला आहे.

घाटी परिसरात घोषणाबाजी
संपाच्या पार्श्वभूमीवर घाटी परिसरात बुधवारी सकाळी घोषणाबाजी झाली. या वेळी परिचारिका संघटनेच्या  इंदुमती थोरात, शुभमंगल भक्त,  महेंद्र सावळे,  मकरंद उदयकार आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Strike of nurses effects treatments in ghati hospital; surgery postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.