नुकसानभरपाईच्या नोटीसविरोधात राज्यातील जिनिंग प्रेसिंगचा संपाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:05 AM2021-01-08T04:05:26+5:302021-01-08T04:05:26+5:30

औरंगाबाद : अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई द्या अशा नोटिसा राज्य उत्पादक पणन महासंघाने पाठविल्याने जिनिग- ...

Strike warning of ginning pressing in the state against the notice of damages | नुकसानभरपाईच्या नोटीसविरोधात राज्यातील जिनिंग प्रेसिंगचा संपाचा इशारा

नुकसानभरपाईच्या नोटीसविरोधात राज्यातील जिनिंग प्रेसिंगचा संपाचा इशारा

googlenewsNext

औरंगाबाद : अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई द्या अशा नोटिसा राज्य उत्पादक पणन महासंघाने पाठविल्याने जिनिग- प्रेसिंग कारखानाधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या नोटिसा रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी ११ व १२ जानेवारी रोजी संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल यांनी दिला आहे.

यासंदर्भात संघटनेतर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी राज्यात एप्रिल महिन्यात जिनिग प्रेसिंग उद्योगातील कापूस खरेदी बंद केली जाते. मात्र, कोरोना महामारीमुळे जिनिग प्रेसिंग कारखाने मार्च २०२० मध्ये पूर्णतः बंद झाले होते. मात्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनामुळे मे २०२० च्या पहिल्या आठवड्यात जिनिग प्रेसिंग सुरू करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशाने व राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑगस्ट २०२० पर्यंत जिनिंग प्रेसिंग सुरू होत्या. ताडपत्री टाकून कापूस, सरकी गाठीचे संरक्षण केले होते. मात्र, फेडरेशनने विहित मुदतीत गाठी, सरकीची उचल व विल्हेवाट केली नाही. दरम्यानच्या काळात अतिवृष्टीमुळे कापूस गाठी, सरकी खराब होऊन प्रतवारी, दर्जा खालावला. यात कोणत्याही जिनिंग प्रेसिंगधारकांचा दोष नव्हता. तरीपण फेडरेशनने राज्यातील अनेक जिनिंग प्रेसिंग कारखानधारांना मोठ्या रकमेच्या नोटीस पाठविल्या आहेत. या नोटिसा रद्द करण्यात याव्यात, कारखानदाराचे बिल कोणतीही नुकसानभरपाई वजावट न करता ५ जानेवारीआधीचे १०० टक्के जॉबवर्क बिल देण्यात यावे व नवीन हंगामासाठी तातडीने जिनिग प्रेसिंगला करारबद्ध करण्यात यावे. या मागणीसाठी ११ व १२ जानेवारी असे दोन दिवस जिनिंग प्रेसिंगधारक संप पुकारणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २५ जानेवारीपासून खरेदीबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनतर्फे दिला आहे. याचे निवेदन राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहे.

Web Title: Strike warning of ginning pressing in the state against the notice of damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.