वारकऱ्यांवर लाठीहल्ल्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे जोरदार निदर्शने

By बापू सोळुंके | Published: June 12, 2023 08:40 PM2023-06-12T20:40:15+5:302023-06-12T20:41:06+5:30

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने टी.व्ही. सेंटर येथे निदर्शने करण्यात आली.

Strong protests by the Thackeray group against the lathi attack on the Warkars | वारकऱ्यांवर लाठीहल्ल्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे जोरदार निदर्शने

वारकऱ्यांवर लाठीहल्ल्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे जोरदार निदर्शने

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने सोमवारी सायंकाळी टी.व्ही.सेंटर येथे शिंदे,फडणवीस सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. 

वारकरी संप्रदायाची  पुण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र आळंदी येथे पालखीसोहळ्या निमित्त राज्यभरातून एकत्र आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी लाठीहल्ला केला.या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि वारकरी या घटनेचा निषेध करीत आहेत. सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने टी.व्ही. सेंटर येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात वारकरी आणि महिला भजनी मंडळ गळ्यात टाळ घालून सहभागी झाले होते. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱी वारकऱ्यांच्या वेशात आंदोलनात सहभागी झाले होते. 


आंदोलनाची सुरवात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ,या उदघोषाने करण्यात आली.  वारकऱ्यावर हल्ला करणाऱ्या शिंदे सरकार, हाय, हाय, देवेंद्र फडणवीस हाय, हाय, धिक्कार असो धिक्कार असो वारकऱ्यावर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो , यासह विविध घोषणा यावेळी दिल्या. यावेळी शिवसेना नेते शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, राजू दानवे, संदेश कवडे,मोहन मेघावाले, माजी नगरसेवक कुलकर्णी, अनिता दातार आदींसह पदाधिकारी आणि महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Strong protests by the Thackeray group against the lathi attack on the Warkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.