कडक सॅल्यूट! औरंगाबादेतील १३३ पोलीस बनले फौजदार

By राम शिनगारे | Published: October 31, 2022 07:42 PM2022-10-31T19:42:55+5:302022-10-31T19:43:56+5:30

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट : राज्य शासनाच्या निर्णयाचा फायदा

Strong salute! 133 policemen in Aurangabad became PSI | कडक सॅल्यूट! औरंगाबादेतील १३३ पोलीस बनले फौजदार

कडक सॅल्यूट! औरंगाबादेतील १३३ पोलीस बनले फौजदार

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य शासनाने पोलीस नाईक हा संवर्ग रद्द घोषित करून त्या संवर्गातील पदे शिपाई, हवालदार व सहायक फौजदार संवर्गामध्ये वर्ग करण्यास मान्यता दिली होती. त्या निर्णयाच्या अधीन राहून सहायक फौजदार असलेल्या कर्मचाऱ्यांना फौजदार संबोधण्यासाठी पोलीस दलात ३० वर्षे सेवा, सहायक फौजदारपदावर किमान तीन वर्षे सेवा आणि फौजदारपदाचे वेतन घेत असलेल्यांना फौजदारपदी पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मान्यतेने उपायुक्त अपर्णा गिते यांनी ऐन दिवाळीत काढले आहेत. याचा फायदा शहरातील तब्बल १३३ पोलीस कर्मचाऱ्यांना झाला असून, ते फौजदार बनले आहेत.

हे झाले फौजदार
पदोन्नती मिळालेल्यांमध्ये मोहम्मद शेख मुक्तार शरीफ, नजीरखान पठाण, देविदास मांदळे, भगवान नाईक, मुन्शी इसा शहा, देवराव दांगुर्डे, सुरेश जिरे, प्रकाश केसरे, रमेश दांडगे, दिलीप मुळे, विलास भवरे, अब्दुल रफिक मो. इसाक, हमीदबेग अजिजबेग, सॅमसन हिवाळे, रमेश गायकवाड, बन्सी राठोड, शेख अझर, भाऊसाहेब कुंटे, म. अनीस म. इलियास, नारायण बुट्टे, धनराज कापडणे, भिवसन तुपे, भालचंद्र पवार, गौतम अंभोरे, शरद गालफाडे, सुरेश देशपांडे, अनिल बोडले, सै. अझर अहेमद सै. जफर, रामदास सोनवणे, अंबादास पवार, राजू सातदिवे, प्रभाकर जायभाय, उत्तम आघाव, संजय गोडघासे, राजू मोरे, राजेश वाघ, सीताराम केदारे, प्रल्हाद शेळके, श्रावण माेरे, दिलीप अंभोरे, अक्रमखान यासीनखान, सुरेश माळे, लक्ष्मण सोरमारे, बाबू राठोड, गोकुळ पाटील, सुभाष कानकाटे, आनंदा कुंवर, रामदास फुसे, धनराज राठोड, द्वारकादास भालेराव, अयुब खान उस्मान पठाण, संजय बनकर, विष्णू मोरे, एकनाथ नरवडे, बशीरखान पठाण, संजयकुमार सुरडकर, सुरेश घाटेकर, महम्मद जलीलोद्दीन काझी, मोहम्मद इजाज, भानुदास हिवराळे, दिलीप गायकवाड, हरी गिरी, शेख युसूफ, अब्दुल कय्युम सिद्दिकी, नागनाथ बनसोड, गुलाम महंमद नशीबोद्दीन, नारायण गायके, महंमद जावेद, युनुसखॉ पठाण, रावसाहेब राठोड, प्रभाकर घोडके, संजय जाधव, गुलाम कदीरखान, शेख साबेर, कुंवरसिंह जाधव, भानुदास कोलते, कैलास सनांसे, देविदास खोतकर, शेख नैमुद्दीन, हरिदास राऊत, अमजद खान, ज्ञानेश्वर शिंदे, गोरख दळवी, रमाकांत पठारे, सईदखान पठाण, दीपक चौधरी, भीमराव घुगे, सखाराम सानप, बालचंद जाधव, तातेराव पवार, रामदास सुरे, प्रकाश शिंदे, भाऊसाहेब हातकंगणे, सिद्धार्थ शिंदे, किसन दुधे, उद्धव वाहूळ, मो. अजहर कुरेशी, विलास पूर्णपात्रे, दीपकसिंह परदेशी, दादासाहेब साबळे, साहेबराव बोर्डे, सुनील शिखरे, विलास जाधव, कडुनाथ कांबळे, अंकुश देशमुख, मच्छिंद्र ससाणे, विश्वानाथ आहेर, शिवाजी केरे, सैय्यद अस्लम, बाबासाहेब रत्नपारखे, विनायक शिंदे, इंदर नरके, सखाराम दिलवाले, जलीलखान हबीबखान पठाण, गंगासागर महाजन, सय्यद रियाजोद्दीन, अर्जुन ऊर्फ मोहन पाटील, धर्मेंद्र शिंदे, नितेश इंद्रोले, सुहास गांगुर्डे, बाबासाहेब इंगळे, नदीमुल्ला खान, संतोष निकाळजे, मंगेश गायकवाड, नितीन मोरे, नंदकिशोर साबळे, नंदकुमार दुबे, शेख कादीर, संपत राठोड, शेषराव चव्हाण यांचा समावेश आहे.

 

Web Title: Strong salute! 133 policemen in Aurangabad became PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.