औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:38 PM2017-10-02T12:38:35+5:302017-10-02T12:41:05+5:30

शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन पुलांवर प्रवाशांची भिस्त आहे; परंतु अरुंद जागेमुळे दररोज हजारो प्रवाशांना गर्दीतून ये-जा करावी लागत आहे, तर रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.

Structural audit paper of footbridge on Aurangabad railway station | औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

googlenewsNext
ठळक मुद्देदोन पुलांवरच प्रवाशांची भिस्तवाढत्या गर्दीमुळे तिस-या पुलाची दुरवस्था

औरंगाबाद, दि. २ : शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन पुलांवर प्रवाशांची भिस्त आहे; परंतु अरुंद जागेमुळे दररोज हजारो प्रवाशांना गर्दीतून ये-जा करावी लागत आहे, तर रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष जात नसल्याने कधीही दुर्घटना घडू शकते.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज धावणा-या, आठवड्यातून एकदा, दोनदा आणि तीनदा धावणाºया अशा ६१ रेल्वेंची येथून ये-जा होते. रेल्वेस्टेशनच्या नव्या आणि जुन्या इमारतीसमोर पादचारी पूल आहे. प्लॅटफॉर्म दोन आणि तीनवर येणाºया रेल्वेतील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी हे दोन्ही पूल महत्त्वाचे ठरतात. पादचारी पुलांना जोडूनच सरकता जिना आणि लिफ्टची सुविधा आहे; परंतु अनेकदा ते बंद असतात. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर रेल्वे आल्यानंतर प्रवाशांच्या गर्दीने पादचारी पूल खचाखच भरून जातो. शिवाय गर्दीच्या नियंत्रणासाठी क ोणीही नसते. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. 

 तसेच रेल्वेस्टेशन परिसरातील हमालवाडा भागात राहणा-या नागरिकांच्या सुविधेसाठी मालधक्का ते रेल्वेस्टेशन पार्किंग असा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. ये-जा करण्यासाठी रेल्वेस्टेशनवरील रुळांऐवजी हा पूल महत्त्वपूर्ण ठरतो; परंतु आजघडीला या पुलाची अवस्था वाईट आहे. जागोजागी फरशा उखडल्या आहेत, तसेच काही ठिकाणी पुलाचा स्लॅब धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्याचा वापर टाळला जात आहे. त्यामुळे पुलाची वेळीच देखभाल-दुरुस्तीची गरज आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन्ही पूल चांगल्या अवस्थेत आहेत. रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या पुलाची माहिती घेतली जाईल, असे रेल्वे अधिका-यांनी सांगितले.

पाय-या निसरड्या

जुन्या आणि नव्या इमारतीसमोरील पुलांवरील कठड्याच्या जाळ्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. जुन्या इमारतीमधील पुलाच्या पाय-या काही ठिकाणी निसरड्या झाल्या आहेत. हमालवाडा परिसरात ये-जा करणा-या पुलाची तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले. 

आॅडिट करणार

सर्व रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांवरून किती प्रवासी ये-जा करतात, याचे आॅडिट केले जाणार आहे. त्यातून पादचारी पुलांची रुंदी वाढविण्याची आवश्यकता आहे का, याचा आढावा घेतला जाईल. आजघडीला केवळ नांदेड, परभणी येथील पादचारी पूल रुंद करण्याची आवश्यकता आहे.
-डॉ. ए. के. सिन्हा, विभागीय व्यवस्थापक, नांदेड, दमरे

Web Title: Structural audit paper of footbridge on Aurangabad railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.