स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:57 PM2017-10-01T23:57:00+5:302017-10-01T23:57:00+5:30

शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे

Structural audit on paper only | स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन पुलांवर प्रवाशांची भिस्त आहे; परंतु अरुंद जागेमुळे दररोज हजारो प्रवाशांना गर्दीतून ये-जा करावी लागत आहे, तर रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष जात नसल्याने कधीही दुर्घटना घडू शकते.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज धावणाºया, आठवड्यातून एकदा, दोनदा आणि तीनदा धावणाºया अशा ६१ रेल्वेंची येथून ये-जा होते. रेल्वेस्टेशनच्या नव्या आणि जुन्या इमारतीसमोर पादचारी पूल आहे. प्लॅटफॉर्म दोन आणि तीनवर येणाºया रेल्वेतील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी हे दोन्ही पूल महत्त्वाचे ठरतात. पादचारी पुलांना जोडूनच सरकता जिना आणि लिफ्टची सुविधा आहे; परंतु अनेकदा ते बंद असतात. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर रेल्वे आल्यानंतर प्रवाशांच्या गर्दीने पादचारी पूल खचाखच भरून जातो. शिवाय गर्दीच्या नियंत्रणासाठी क ोणीही नसते. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तसेच रेल्वेस्टेशन परिसरातील हमालवाडा भागात राहणाºया नागरिकांच्या सुविधेसाठी मालधक्का ते रेल्वेस्टेशन पार्किंग असा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. ये-जा करण्यासाठी रेल्वेस्टेशनवरील रुळांऐवजी हा पूल महत्त्वपूर्ण ठरतो; परंतु आजघडीला या पुलाची अवस्था वाईट आहे. जागोजागी फरशा उखडल्या आहेत, तसेच काही ठिकाणी पुलाचा स्लॅब धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्याचा वापर टाळला जात आहे. त्यामुळे पुलाची वेळीच देखभाल-दुरुस्तीची गरज आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन्ही पूल चांगल्या अवस्थेत आहेत. रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या पुलाची माहिती घेतली जाईल, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Structural audit on paper only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.