तरूणावर चाकूहल्ला करून पळालेल्या भु-याला दोन तासांत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 08:56 PM2018-12-16T20:56:02+5:302018-12-16T20:56:31+5:30
पैठणगेट येथील एका टपरीवर तरुणावर चाकूहल्ला करून त्याच्या खिशातील सात हजार रुपये हिसकावून नेणाºया कुख्यात भु-या उर्फ वाजीद बबलू कुरेशी (रा. सिल्लेखाना) हा घाटीतील पोलिसांच्या सतर्कतमुळे क्रांतीचौक पोलिसांच्या हाती लागला.
औरंगाबाद : पैठणगेट येथील एका टपरीवर तरुणावर चाकूहल्ला करून त्याच्या खिशातील सात हजार रुपये हिसकावून नेणाºया कुख्यात भु-या उर्फ वाजीद बबलू कुरेशी (रा. सिल्लेखाना) हा घाटीतील पोलिसांच्या सतर्कतमुळे क्रांतीचौक पोलिसांच्या हाती लागला. आरोपी भु-याला घटनेनंतर अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी सांगितले की, पैठणगेट येथील असद कुरेशी हे शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास एका हॉटेलजवळील पानटपरीवर उभे होते. त्यावेळी आरोपी भुºया तेथे आला आणि त्याने असद यांच्याकडे सिगारेटसाठी पैसे मागितले. असद यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे भुºयाला सांगितले. याचा राग धरुन भुºयाला त्याने असद यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यांच्या खिशातील रोख सात हजार रुपये जबरीने काढून घेतले. या झटापटीत भुºयालाही मार लागला. यानंतर तो पैठणगेट येथून पळून गेला. या घटनेमुळे पैठणगेट परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सहायक निरीक्षक एस.एस. जाधव, गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तो घाटी रुग्णालयातील अपघात विभागात उपचारासाठी दाखल झाला. तो अपघात विभागात आरडाओरड करीत होता. यामुळे तेथील डॉक्टर घाबरले होते. त्यांनी सुरक्षारक्षकांना बोलावून घेतले. त्याचवेळी घाटी चौकीतील पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले तेव्हा त्यांना हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार भुºया असल्याचे समजले. त्यांनी अन्य कर्मचाºयांच्या मदतीने ताब्यात घेतले आणि क्रांतीचौक पोलिसांना आरोपीची माहिती कळविण्यात आली. सहायक निरीक्षक जाधव आणि कर्मचाºयांनी घाटीत जाऊन भुºयाला बेड्या ठोकल्या. असद यांच्या तक्रारीवरून भुºयाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
एमपीडीएक कारवाईतून सुटला अन...
कुख्यात भुºयाकडून यापूर्वीही एका अंडा आम्लेट सेंटर चालकावर हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करून त्याला हर्सूल जेलमध्ये डांबले होते. पोलीस आयुक्तांनी भुºयावर केलेली कारवाई उच्चस्तरीय समितीने रद्द ठरविल्याने भुºया कारागृहातून बाहेर आला. पोलिसांच्या रेकॉर्डवरील तो सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र या कारवाईचा कोणताही परिणाम भुºयावर झाला नसल्याचे रात्रीच्या घटनेवरुन समोर आले.