आॅनलाइन ठकवणूक प्रकरणी खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:23 AM2017-11-03T01:23:58+5:302017-11-03T01:24:02+5:30
गस वेबसाइट तयार करून देशभरातील बेरोजगारांना विविध प्रकारची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाºया तरुणाच्या साथीदाराला नुकतीच ग्रामीण पोलिसांनी अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बोगस वेबसाइट तयार करून देशभरातील बेरोजगारांना विविध प्रकारची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाºया तरुणाच्या साथीदाराला नुकतीच ग्रामीण पोलिसांनी अटक केली. नव्याने अटक करण्यात आलेला आरोपी हा मुंबईतील एका कॉर्पोरेट कंपनीत विभागीय व्यवस्थापकपदी कार्यरत होता.
हितेश कुंबळे (रा. अंधेरी, मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले की, आॅगस्टमध्ये वडोदबाजार ठाण्यात रमेश गणेश कुलकर्णी यांनी तक्रार नोंदवून त्यांना ई-सेंटर नावाने संकेतस्थळ सुरू करून देण्याचे आमिष दाखवून फसविण्यात आल्याचे नमूद केले होते. महा ई-सेंटर नावाच्या या संकेतस्थळावर बस, रेल्वे तिकीट, मतदार कार्ड, आधार कार्ड, आधार बायोमेट्रिक मशीन, जन्माचा दाखला काढून देण्यासाठी आवश्यक एजन्सी सॉफ्टवेअर देऊ, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले. या एजन्सीसाठी १५ हजार रुपये अॅडव्हान्स भरण्यास सांगितले होते. पैसे भरल्यानंतर दोन आठवडे झाले तरी सॉफ्टवेअर न मिळाल्याने कुलकर्णी यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी ही माहिती सायबर शाखेला दिली. पोलिसांनी तपास करून त्यांची फसवणूक करणारा शेखर ओमकारप्रकाश पोतदार (३२, रा. जरीपटका, नागपूर) यास अटक केली.