विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार औरंगाबादेत येणार
By Admin | Published: July 13, 2017 04:55 PM2017-07-13T16:55:45+5:302017-07-13T17:00:48+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) विद्यार्थी संसदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार ७ आँगस्ट रोजी शहरात येत असल्याची माहिती अॅड. अभय टाकसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) विद्यार्थी संसदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार ७ आँगस्ट रोजी शहरात येत असल्याची माहिती अॅड. अभय टाकसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशद्रोहाच्या आरोपामुळे देशभर चर्चेत आलेल्या कन्हैय्या कुमार यांना शहरात आणण्यासाठी डाव्या, आंबेडकरवादी संघटना अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होत्या.
‘जेएनयू’त ९ आॅगस्ट २०१६ रोजी देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैय्या कुमारसह इतरांना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा देशभर गदारोळ निर्माण झाला होता. याचवेळी हैदराबाद विद्यापीठातील रोहीत वेमुला आत्महत्या प्रकरणी रोहीत अॅक्ट मंजूर होण्यासाठी कन्हैय्या कुमारसह इतर काही संघटना आंदोलन करत होत्या. या आंदोलनांमध्ये देण्यात येणाºया घोषणाही लोकप्रिय झाल्या. यामुळे कन्हैय्या कुमार यांना देशभरातुन पाठिंबा आणि आमंत्रणे मिळत होती. यामुळे आतापर्यंत त्यांची शहरातील तारीख मिळू शकली नसल्याचे अॅड. टाकसाळ यांनी सांगितले. कन्हैय्या कुमार यांचा पीएच. डी. चा शोधप्रबंध अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो विद्यापीठाकडे सादर होणार आहे. यामुळे त्यांनी औरंगाबादेत ७ आॅगस्ट रोजी येण्यास होकार कळविला असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कन्हैय्या कुमार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन आॅल इंडिया स्टुडन्टस् फेडरेशन, एसएफआय, अॅन्टी इस्टॅब्लीशमेंट सोशल फोरम, यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, पँथर सेना, अभ्यूदय फाऊंडेशन, आॅल इंडिया युथ फेडरेशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआय, अनिस, नव महाराष्ट्र युवा अभियान, प्रोग्रेसिव्ह युथ फोरम, समता विद्यार्थी आघाडी, सरकार युवा प्रतिष्ठान, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, एसआयओ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, बहुजन विद्यार्थी मोर्चा, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. य पत्रकार परिषदेला बुध्दप्रिय कबीर, सुनिल राठोड, योेगेश खोसरे, प्रा. भारत सिरसाठ,अॅड. शेख अयास, जॅक्सन फर्नांडिस, सोनालिका नागभिडे,सुबोध जाधव, अतुल बडवे, राहुल तायडे आदी उपस्थित होते.