हसून हसून दमाल! चक्क उत्तरपत्रिका घेऊनच ‘तो’ पळाला; बारावी गणिताच्या परीक्षेवेळी झाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:08 AM2023-03-04T07:08:12+5:302023-03-04T07:09:09+5:30

शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता.  उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांकाच्या कक्षात पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेल्या उत्तरपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना वाटल्या.

student ran away with the answer sheet in HSC EXam; There was confusion during the 12th maths exam | हसून हसून दमाल! चक्क उत्तरपत्रिका घेऊनच ‘तो’ पळाला; बारावी गणिताच्या परीक्षेवेळी झाला गोंधळ

हसून हसून दमाल! चक्क उत्तरपत्रिका घेऊनच ‘तो’ पळाला; बारावी गणिताच्या परीक्षेवेळी झाला गोंधळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा भागात नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी एका परीक्षार्थी विद्यार्थ्याने गणिताचा पेपर अवघड चालल्यामुळे चक्क उत्तपत्रिका 
घेऊनच परीक्षा कक्षातून धूम ठोकली. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या पर्यवेक्षकाने केंद्र संचालकांमार्फत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्याला एका खासगी अभ्यासिकेतून पकडून आणले.

शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता.  उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांकाच्या कक्षात पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेल्या उत्तरपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना वाटल्या. त्यानंतर या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेची शिलाई उसवली व त्यातील १३, १४, १५ आणि १६ या क्रमांकाची पाने व प्रश्नपत्रिका बेंचवर ठेवून तो लघुशंकेसाठी म्हणून बाहेर गेला. त्याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन परीक्षा केंद्रातून पळ काढला.

असे आले लक्षात
परीक्षार्थी परत न आल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. 
बरीच शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मात्र, आपण उत्तरपत्रिका नेलेलीच नाही, यावर तो ठाम राहिला. 
शेवटी त्याचे वडील केंद्रात आले. तेव्हा मात्र त्याने वडिलांना सोबत नेलेली उत्तरपत्रिका कुठे ठेवली, ते सांगितले.

पेपर सुरू हाेण्यापूर्वीच झाला व्हायरल
बुलडाणा :  बारावीचा गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी १०:३० वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा पेपर सिंदखेडराजा तालुक्यातील एका केंद्रावरून समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. याविषयी पाेलिसात तक्रार दाखल केली असून  काेणत्या केंद्रावरून व किती वाजता हा पेपर व्हायरल झाला, याचा शाेध सुरू आहे. 

Web Title: student ran away with the answer sheet in HSC EXam; There was confusion during the 12th maths exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.