विद्यार्थिनी, नोकरदार महिला प्रवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:13 PM2019-01-29T23:13:12+5:302019-01-29T23:14:29+5:30
औरंगाबाद : विद्यार्थिनी, नोकरदार महिला प्रवाशांनी उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे मंगळवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर संताप व्यक्त केला. ‘आम्ही अभ्यास करायचा की, रेल्वेचे वेळापत्रक बघायचे?’ असा सवाल महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी उपस्थित केला.
औरंगाबाद : विद्यार्थिनी, नोकरदार महिला प्रवाशांनी उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे मंगळवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर संताप व्यक्त केला. ‘आम्ही अभ्यास करायचा की, रेल्वेचे वेळापत्रक बघायचे?’ असा सवाल महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी उपस्थित केला.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त औरंगाबादला दररोजच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होते. गेल्या काही दिवसांपासून काही रेल्वे वारंवार उशिरा धावत आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून नियमित प्रवास करणाºया मासिक पासधारक प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याविरुद्ध आंदोलन पुकारत प्रवासी सोमवारपासून काळ्या फिती लावून प्रवास करून रेल्वे प्रशासनाचा निषेध करीत आहेत. प्रवाशांचे हे आंदोलन ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. आंदोलनाच्या दुसºया दिवशीही रेल्वेस्टेशनवर प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महाविद्यालयात वर्ग सुरू असताना रेल्वे कधी येणार, हे पाहण्याची वेळ येते. विस्कळीत वेळापत्रकामुळे वर्ग सोडून रेल्वेस्टेशन गाठावे लागते. रेल्वेस्टेशनला आल्यानंतर रेल्वे वेळेवर येत नाही. वेटिंग रूममध्ये बसता येत नाही. घरी जाण्यास उशीर होतो. पुन्हा सकाळी लवकर उठून रेल्वे पकडावी लागते, असे महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सांगितले. दिवसभर नोकरीच्या ठिकाणी काम केल्यानंतर घरी जाण्यास उशीर होते. त्यामुळे स्वयंपाकासह अन्य घरकामावरही परिणाम होत असल्याचे महिला प्रवाशांनी सांगितले. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवाशांची यावेळी उपस्थिती होती.
रेल्वेचा लाईन ब्लॉक
कोडी ते रंजनी आणि पेरगाव ते परभणी स्टेशनदरम्यान रेल्वेपुलाच्या कामासाठी २ आणि ८ फेब्रुवारीला आरसीसी बॉक्स बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी यादिवशी ३ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काचीगुडा- मनमाड पॅसेंजर, औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजरच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.