विद्यार्थ्यांचा स्थापत्य, विद्युत, यंत्र अभियांत्रिकीकडे कल

By Admin | Published: June 19, 2017 11:47 PM2017-06-19T23:47:16+5:302017-06-19T23:50:52+5:30

जालना : तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली

Students of Architecture, Electrical, Machine Engineering | विद्यार्थ्यांचा स्थापत्य, विद्युत, यंत्र अभियांत्रिकीकडे कल

विद्यार्थ्यांचा स्थापत्य, विद्युत, यंत्र अभियांत्रिकीकडे कल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. जालना व अंबड तंत्रनिकेतनमधील अभियांत्रिकीच्या विविध शाखांसाठी केंद्रीय पद्धतीने राबवल्या जाणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. शासकीय व खाजगी क्षेत्रात वाढत्या नोकरीच्या संधीमुळे तंत्रनिकेतनच्या स्थापत्य, विद्युत, यंत्र अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
दहावीनंतर तंत्रनिकेतनच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन करिअर्सचा मार्ग शोधणाऱ्या युवकांची संख्या मोठी असल्याने तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला विशेष महत्त्व आहे. जालना शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकीच्या विद्युत, स्थापत्य, यंत्र, संगणक, रसायन या शाखा उपलब्ध आहेत. प्रथम वर्षाकरिता सकाळच्या सत्राच्या २८० तर दुपारच्या सत्राच्या १८० जागा उपलब्ध आहे. असल्याची माहिती येथील प्रवेश प्रक्रिया समितीचे विलास पाठक यांनी दिली. आॅॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची मान्यता प्राप्त अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतमध्ये संगणक, स्थापत्य , माहिती व तंत्रज्ञान , अणूविद्युत , यंत्र आणि विद्युत अभियांत्रिकी या शाखांसाठी प्रत्येकी ६० उपलब्ध आहेत. तर अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या सत्रात चालविल्या जाणाऱ्या शाखांच्या १२० जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी तीन फेऱ्यांसह एक अतिरिक्त फेरी व समुपदेशन फेरी राबवली जाणार आहे. अर्ज प्रक्रि येसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांस एॅॅल्पिकेशन कीट घ्यावी लागणार आहे. राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च २०१८ पर्यंत नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
अंबड तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांना मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया कीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे येथील तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता पी. यु. औटी यांनी सांगितले.

Web Title: Students of Architecture, Electrical, Machine Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.