सीईटीपेक्षा अर्ज करण्यातच विद्यार्थ्यांचा लागतोय कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:04 AM2021-07-27T04:04:46+5:302021-07-27T04:04:46+5:30

औरंगाबाद : राज्य शिक्षण मंडळाने अकरावी ऐच्छिक ऑफलाईन सीईटीसाठी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सोमवारी दुपारी ३ वाजेपासून सुरु होईल ...

Students have to work harder to apply than CET | सीईटीपेक्षा अर्ज करण्यातच विद्यार्थ्यांचा लागतोय कस

सीईटीपेक्षा अर्ज करण्यातच विद्यार्थ्यांचा लागतोय कस

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य शिक्षण मंडळाने अकरावी ऐच्छिक ऑफलाईन सीईटीसाठी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सोमवारी दुपारी ३ वाजेपासून सुरु होईल असे सांगण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री आठ वाजताही संकेतस्थळावर औरंगाबाद विभागाच्या लिंकमध्ये नोंदणी होण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. बहुतांश ठिकाणी ही लिंक सुरुच होऊ शकली नव्हती. त्यामुळे सीईटीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नाही. तर, पालक, विद्यार्थ्यांकडून शिक्षकांकडे अर्ज कसा करायचा, कुठे करायचा याबद्दल विचारणा सुरु होती.

मंडळाकडून दिलेल्या पत्रकात २० व २१ जुलैला ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केले. त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक व आवेदन पत्र भरताना नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकून संकेतस्थळावर पाहता येणार असल्याचे म्हटले आहे. तर परिपूर्ण अर्ज सादर केलेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसून प्रक्रिया पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे. दोन ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत अर्ज करता येणार असला तरी परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचा अर्ज करण्यातच कस लागतोय. त्यामुळे परीक्षेपेक्षा अर्जासाठी मनस्ताप विद्यार्थी सहन करत आहे.

Web Title: Students have to work harder to apply than CET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.