बसअभावी बुडाली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:45 AM2017-08-05T00:45:53+5:302017-08-05T00:45:53+5:30

माजलगाव आगारातून वेळेवर बस न सुटल्याने व बस थांबत नसल्याने शुक्रवारी विद्यार्थी आक्रमक झाले

Students protest demonstrations against ST | बसअभावी बुडाली शाळा

बसअभावी बुडाली शाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगामसला : माजलगाव आगारातून वेळेवर बस न सुटल्याने व बस थांबत नसल्याने शुक्रवारी विद्यार्थी आक्रमक झाले. आगाराच्या गलथान कारभारामुळे शाळा बुडविण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. अखेर त्यांना शाळा सोडून रास्ता रोको करण्याचा मार्ग अवलंबावा लागला. विशेष म्हणजे या आंदोलनाकडे रापम प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
एकीकडे शासन शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. त्यासाठी लाखो रूपयांचा खर्च करीत आहे. तर दुसºया बाजूला विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थी बसचा आधार घेतात. परंतु काही बसचालक मनमानी कारभार करीत बस थांबवत नाहीत. असाच प्रकार माजलगाव तालुक्यातील एकबुर्जी, जीवनापूर, सिमरी पारगाव, लोणगाव, पायटांगी तांडा, पट्टी तांडा, देवळा यासह अनेक वाडी-वस्त्या असलेल्या रस्त्यावर वारंवार घडत आहे.
शुक्रवारी माजलगाव आगारातून माजलगाव-जीवनापूर-सिरसाळा ही बस सोडण्यात न आल्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. तसेच श्ेिंपेटाकळी, बोरगाव, आंबेगाव, सांडस चिंचोली, नागडगाव, रोषणपुरी या मार्गावर बस न थांबवल्यामुळे रास्ता रोको आंदोलन विद्यार्थ्यांनी शिंपेटाकळी फाटा येथे केले.
तसेच रापम विरोधात शुक्रवारी सकाळी विद्यार्थी, पालकांनी एकबुर्जी येथे रास्ता रोको आंदोलन केले. चार तास चाललेल्या या आंदोलनाकडे कोणीच फिरकले नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. बस वाढवून देण्याची मागणी या भागातील शाळेच्या मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थ्यांनी केली आहे.

Web Title: Students protest demonstrations against ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.