सीईओंच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा
By Admin | Published: June 18, 2014 01:06 AM2014-06-18T01:06:22+5:302014-06-18T01:25:18+5:30
परभणी : तालुक्यातील माऊली शिक्षण संस्था बेलखेडा द्वारा संचलित कै़ किश्नराव आघाव माध्यमिक विद्यालय जांब बु़ या शाळेचे स्थलांतर करू नये,
परभणी : तालुक्यातील माऊली शिक्षण संस्था बेलखेडा द्वारा संचलित कै़ किश्नराव आघाव माध्यमिक विद्यालय जांब बु़ या शाळेचे स्थलांतर करू नये, या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी सीईओंच्या दालनात शाळा भरविली़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली़ यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले़
जिंतूर तालुक्यातील जांब बु़ येथील कै़ किशनराव आघाव माध्यमिक विद्यालयाचे स्थलांतर झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ हे स्थलांतर रद्द करावे, या मागणीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरविली़ त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ तसेच विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला़ यावेळी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती़ तसेच जि़ प़ चे शिक्षणाधिकारी गिरी यांना निवेदन देण्यात आले़
या निवेदनावर नारायण आसाराम बुधवंत, शंकर बुधवंत, सुभाष मोरे, बालासाहेब हेंडगे, प्रभाकर चाटे, भारत राठोड, उत्तम जाधव, माधव जाधव, रवी जाधव, प्रमोद घुगे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, बालाजी कऱ्हाळे, अनंता कदम, गणेश शेवाळे, बंडू आडे, अभिषेक राठोड, केशव राठोड, विश्वनाथ आडे, अरविंद जाधव, एकनाथ आडे, शंकर आडे, पवन गाडे, पांडुरंग जाधव, अजय मोहिते, प्रियंका बोडखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)
गिरींना धरले धारेवर
जांब बु़ येथील कै़ किशनराव आघाव माध्यमिक विद्यालयाचे स्थलांतर रद्द करावे, या मागणीसाठी पालकांनी शिक्षणाधिकारी आऱ बी़ गिरी यांना धारेवर धरले़ यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनीही गिरी यांना पालक व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा केली़ यावेळी नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, सलीम काझी यांचीही उपस्थिती होती़ विजय भांबळे यांनी मध्यस्थी केल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले़