विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवून कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 08:44 PM2019-07-04T20:44:15+5:302019-07-04T20:49:39+5:30

विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवून कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे केले.

 Students should develop intellectual abilities and acquire skillful education | विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवून कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे

विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवून कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे

googlenewsNext

करमाड : विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवून कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे केले.


येथील न्यू हायस्कूल करमाडच्या वतीने गुरुवारी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गणवेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सतीश चव्हाण, विलास औताडे होते. बागडे म्हणाले की, आजच्या युगात शिक्षणामुळे स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन, पाठण व मनन करावे. तसेच पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


कार्यक्रमाला दामूआण्णा नवपुते, नगरसेवक राजू शिंदे, पं.स.सभापती ताराबाई उकर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, सरपंच दत्तात्रय उकर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, अभिजित देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, कैलास उकर्डे, एकनाथ सोळुंके,एकनाथ अवचरमल, जहीर करमाडकर,रफिक पठाण, रामकिसन भोसले, तुकाराम महाराज तारो यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविक प्राचार्या उज्वला पवार यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय खेबडे यांनी केले. आभार मंजुषा गव्हाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम घावटे, संजय बोराडे,राम तारो, देवकर,श्रीमती निकम, मंडपमाळी यांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Students should develop intellectual abilities and acquire skillful education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.