विद्यार्थी गिरवितात ग्रामीण रुग्णालयात आरोग्यविषयक धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:06 AM2021-02-05T04:06:41+5:302021-02-05T04:06:41+5:30
सोयगाव : व्यवसायाभिमुख शिक्षण काळाची गरज बनली आहे. पुस्तकीय ज्ञानासोबत पुरक शिक्षण म्हणून जिल्हा परिषदेच्या इयत्ता नववी आणि दहावीच्या ...
सोयगाव : व्यवसायाभिमुख शिक्षण काळाची गरज बनली आहे. पुस्तकीय ज्ञानासोबत पुरक शिक्षण म्हणून जिल्हा परिषदेच्या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सोयगावला ग्रामीण रुग्णालयात तासभर प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा परिषद प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू झाला. यामध्ये शाळेच्या वेळेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात असांसर्गिक आणि सांसर्गिक रोगांची प्राथमिक माहिती देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन काळे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका प्रियांका कस्तुरे यांनी पुढाकार घेतला असून, ग्रामीण रुग्णालयात त्या विद्यार्थ्यांना तासभर प्रात्यक्षिक देतात. यामुळे मुलांच्या जिज्ञासेत भर पडत आहे, असेही प्रियांका कस्तुरे यांनी सांगितले.
छायाचित्र ओळ : सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थी आरोग्यविषयक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.