जीवदानासाठी सरसावले विद्यार्थी, शिक्षक आणि डाॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:03 AM2021-07-07T04:03:51+5:302021-07-07T04:03:51+5:30

औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा ...

Students, teachers and doctors rushed to save lives | जीवदानासाठी सरसावले विद्यार्थी, शिक्षक आणि डाॅक्टर

जीवदानासाठी सरसावले विद्यार्थी, शिक्षक आणि डाॅक्टर

googlenewsNext

औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम सोमवारी निपाणी भालगाव परिसरातील शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुलात यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे राबविण्यात आला. या शिबिरात रक्तदान हेच जीवदान म्हणून कोरोना योध्द्‌यांसह, महाविद्यालयातील डाॅक्टर, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी रक्तदानाला उत्स्फूर्त प्रदिसाद देत, या महायज्ञात सहभाग नोंदविला.

शिबिराचे उद्घाटन 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार आणि उपाध्यक्ष मनोज बोरा यांच्या वाढदिवसानिमित्त दर्डा यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लायन्स ब्लड सेंटर, उस्मानपुरा यांनी शिबिरासाठी रक्तसंकलन केले. त्यासाठी डाॅ. राजाभाऊ चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मनोज चव्हाण, अनिल शर्मा, अश्विनी नरवडे, सूर्यकांत तांबे, महोम्मद जाकीर, नागेश हिवराळे, भरत पाटणकर, अविनाश सोणवने, भारती अंध्याल यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला उपाध्यक्ष मनोज बोरा, काॅंग्रेसचे गटनेते मनपा भाऊसाहेब जगताप, शेखर म्हस्के, भालगावचे सरपंच सुभाष दिघुळे, सदस्य पांडू दिघुळे, कैलास पाथ्रीकर, महेबूब भाई, राहुल सावंत, बाळासाहेब हरबक, अरुण पाटील, प्राचार्य डाॅ. संदीप कांबळे, उपप्राचार्य डाॅ. पंकज घहुंगे, सुनील गरंडवाल, निपाणीचे सरपंच मनोज गरंडवाल, मनपा स्थायी समिती सभापती मनोज गांगवे, नर्सिंग संघटनेचे सचिव शंकर आडसुळ, संजय गवळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल गंगवाल यांनी केले, तर व्यवस्थापन अनिल झाल्टे, डाॅ. अली बडगिरे, डाॅ. प्राची मुरकुटे, डाॅ. मंगेश पवार, डाॅ. दीपक आपार, डाॅ. राणी वैराळे, डाॅ. पूजा पंडित, सुभाष राठोड, विशाल चव्हाण यांनी पाहिले.

---

बाबूजींचा खेड्यापाड्यात डाॅक्टर पोहोचवण्याचा प्रयत्न

श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयांना मान्यता दिली गेली. त्यामागे खेड्यापाड्यात, वाडी-वस्तीवर आरोग्य सेवा देण्यासाठी जाऊ शकणारे डाॅक्टर तयार करण्याचा दूरदर्शी प्रयत्न होता, असे सांगत शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. बाळासाहेब पवार यांनी प्रास्ताविकात श्रद्धेय बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.

---

रक्ताचा थेंब वाया जाणार नाही असे नियोजन : राजेंद्र दर्डा

रक्तदानापेक्षा दुसरे श्रेष्ठ दान नाही. कोरोनामुळे रक्तदाते समोर येत नाहीत. अपघात वाढले आहेत. त्यासाठी रक्ताची आवश्यकता भासत आहे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. राज्यभरात रक्तपेढ्यांतील गरज किती, यावर लक्ष ठेवून रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि रक्तसंकलनातील रक्ताचा वापर होईल. एक थेंबही वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊ, असे 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

---

यांनी केले रक्तदान...

तीतिक्षा पाठक, नेहल अहेमद, कृष्णा बिस्वास, प्रांजली भोपेवार, वर्षा दुधे, प्राची मुरकुटे, डाॅ. शीतल पवार, सय्यद फरहीन फातेमा, शेख अनम या विद्यार्थिनी व महिला डाॅक्टरांसह अनिकेत काकडे, वैभव वाघमारे, पवन शेळके, इम्रान तडवी, संदीप चव्हाण, विवेक मोगले, साैरब शेख, अनुराग घुगे, सुश्रूत हिंदळकर, संकेत जाधव, निखिल पवार, नझीर खान, मोबीन रज्जाक, प्रसाद हिरेमठ, अविनाश पवार, कामेश हिंगोले, अनिकेत थत्ते, सचिन घनगाव, नीलेश मंजुळे, शिवाजी वाघमोडे, सिद्धेश्वर पवार, महेश पवने, आशिष तावडे, कल्याण चव्हाण, ऋतुराज डोरले, अनिकेत राठोड, संदीप कांबळे, पंकज गाहुंगे, डाॅ. मंगेश पवार, रजनिकांत काकडे, विशाल चव्हाण, ऋषिकेश बोंबले, अश्विन कांबळे, अजय करवंदे, अकबर शेख, श्रीधर डवरे, प्रसाद मिरगे, विजय गायकवाड, धनुसिंग चव्हाण, परमेश्वर सिघाडे, अधिकारी मिस्त्री, नितीन चव्हाण, राहुल सपकाळ, आकाश तुपे, मेहराज बंडे, नीलेश मंजुळे, अनिल झाल्टे, सतीश पाटील, शरद जाधव, फिरोज बेग, राकेश हाडळकर, रेवण जेजुरकर, अनिकेत साखरे, कृष्णल अभट, राहुल चव्हाण, अयुष बोराळे, यशवंत मोहिते, शिवेरा साळवे, शुभम सूर्यवंशी, कैलास चव्हाण, योगेश ताठे या विद्यार्थी, डाॅक्टर, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

Web Title: Students, teachers and doctors rushed to save lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.