उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गायब, कर्मचाऱ्यांकडून उपचार

By Admin | Published: May 12, 2017 11:44 PM2017-05-12T23:44:41+5:302017-05-12T23:47:32+5:30

परंडा : डॉक्टरांची गैरहजेरी असल्याने विविध आजारांमुळे विव्हळत असलेल्या रुग्णांवर कर्मचाऱ्यांनीच औषधोपचार केल्याचा प्रकार गुरूवारी रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाला़

Sub-district hospital doctor disappears, treatment from employees | उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गायब, कर्मचाऱ्यांकडून उपचार

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गायब, कर्मचाऱ्यांकडून उपचार

googlenewsNext

विजय माने।
लोकमत न्यूज नेटवर्क
परंडा : डॉक्टरांची गैरहजेरी असल्याने विविध आजारांमुळे विव्हळत असलेल्या रुग्णांवर कर्मचाऱ्यांनीच औषधोपचार केल्याचा प्रकार गुरूवारी रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाला़ ईसीजी, एक्स-रे, ब्लडबँक आदी असुविधांमुळे रुग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ विशेषत: अल्ट्रा सोनोग्राफी विभागाचे तर स्टोअररूममध्ये रूपांतर झाल्याचे दिसून आले़
शहरासह तालुक्यातील ९६ गावातील नागरिकांना येथील उपजिल्हा रुग्णालयातून आरोग्य सेवा मिळते़ बुधवारी रात्री ९ वाजता उपजिल्हा रुग्णालयात ‘आॅन डयूटी’ असलेल्या डॉ़ निलोफर पठाण रुग्णालयात आढळून आल्या नाहीत़ त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयाची जवाबदारी परिचारिका उल्का कोल्हे, शत्रक्रिया परिचारीका एस़एस़ जाधव यांच्या खांद्यावर दिसून आली. त्यावेळी पिठापुरी येथील खरात दाम्पत्य आपल्या १४ वर्षाच्या मुलाला घेऊन रुग्णालयात आले. गणेश खरात यांच्या पाठीला कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले होते. रुग्णालयात आले तेव्हा गणेश खूप भयभित अवस्थेत होता. डॉक्टर नसल्याने परिचारिका कोल्हे व शस्त्रक्रिया विभागाच्या परिचारीका जाधव यांनीच गणेशवर उपचार केले. डॉक्टर गैरहजर असल्याने सतिष खरात यांचा पारा सातव्या आसमानावर गेल्याचा पहावयास मिळाला. रात्री १०़०५ वाजता अंतर्गत विभागाच्या मुख्यद्वारावर एकाच दुचाकीवर भोत्रा गावाहून चौघे आले़ ११ वर्षीय साक्षी जाधवला विंचू चावल्याने तिला वेदना असाहय होत होत्या़ साक्षी जाधवचे वडील, पत्नी, मुलगा साक्षीला घेऊन दुचाकीवरुन आले होते. रुग्णालयात साक्षीला फरशीवर खाली बसवून उपचार करण्यात आले. हे उपचार देखील परिचारीकेच्या हातूनच करण्यात आले़ जवळपास अर्धा तास गायब असलेल्या डॉ़ निलोफर पठाण ह्या ९़२१ वाजता आल्या आणि काही वेळ थांबून १०़१४ वाजता निघून गेल्या़ त्या रात्री १२़३० पर्यंत परतल्या नव्हत्या़ यादरम्यान रुग्णालयातील अंतर्गत व बाहय परिसराचा आढावा घेतला असता ‘अल्ट्रा सोनोग्राफी’ विभागाला स्टोअररुम बनवण्यात आल्याचे दिसून आले. ही अल्ट्रा सोनाग्राफी अनेक वर्षापासून बंद पडली आहे़ अंतरुग्ण विभागातील नातेवाईक मिळेल त्या जागेत झोपले होते. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची मुबलक सुविधा नाही़ बंद पडलेल्या फिल्टरव्दारे गरम पाणी रुग्णासह नातेवाईकांना प्यावे लागते. रुग्णालयातील कामाचे वेळापत्रक दर्शवणाऱ्या फलकावरही १५ मार्च रोजी आॅनडयूटी असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे होती़ डॉक्टरचा कॉलम मात्र होता. ब्लड बँकेच्या शेजारील रूमचे बांधकाम सुरू असल्याने हा विभागही बंद आहे़ गरजेनुसार रक्तबॅग मागविण्यात येतात.

Web Title: Sub-district hospital doctor disappears, treatment from employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.