उपजिल्हा रुग्णालयाचा भार सहा परिचारिकांवर
By Admin | Published: May 15, 2014 12:09 AM2014-05-15T00:09:22+5:302014-05-15T00:17:09+5:30
उद्धव चाटे, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसेविका व परिचारिकांच्या जागा रिक्त असल्यामुळे ६ परिचारिकांवर रुग्णालयाचा कारभार चालत आहे.
उद्धव चाटे, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसेविका व परिचारिकांच्या जागा रिक्त असल्यामुळे ६ परिचारिकांवर रुग्णालयाचा कारभार चालत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन मोठे वार्ड आहेत. त्यात एक पुरूष कक्ष, एक स्त्री कक्ष व अपघात कक्ष तसेच कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया कक्ष, प्रसुती विभाग, नवजात शिशू कक्ष यांचा समावेश आहे. या सर्व वार्डात ६ परिचारिका असल्यामुळे एकावेळी फक्त एकच अधिपरिचारिका ड्युटीवर असते. या एकाच परिचारिकेला तीन वार्ड व प्रसूती विभागाचे कामकाज पहावे लागते. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या रिक्त जागा भराव्यात व परिचारिकेवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील परिसेविकांची रिक्त पदे खालीलप्रमाणे परिसेविका-२ , पुरूष कक्ष अधिपरिचारिका- ०४, स्त्री कक्ष-०४, अपघात विभाग- ०४, प्रसूतीपश्चात विभाग- ०४, शस्त्रक्रिया विभाग - ०४, बाह्यरुग्ण विभाग - ०२, प्रसूती विभाग व नवजात शिशू विभाग- ०४ अशी एकूण २७ अधिपरिचारिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहेत त्या परिचारिकेवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने परिचारिकामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. त्यामुळे शहर व ग्रामीण भागामधून येणार्या हजारो रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. याचे सोयरसूतक संंबंधित वरिष्ठ अधिकार्यांना नाही.