समर्थनगरातील चोरीतील मुद्देमाल केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:54 PM2019-02-12T22:54:44+5:302019-02-12T22:55:35+5:30

गुन्हे शाखेने समर्थनगरातील घरफोडीप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या मामा-भांजे टोळीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन गावांत लपविलेले सोने पोलिसांना काढून दिले. त्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल शिर्डीतून गुन्हे शाखेने ताब्यात घेतली असून, तीही चोरीची असल्याचे समोर आले. समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमधील रहिवासी बँकेच्या अधिकारी सुनीता पुराणिक यांची सदनिका फोडून ५० तोळे दागिने व रोख असा एकूण १६ लाखांचा ऐवज पळविला होता.

Sub-Saharan arrested for robbery | समर्थनगरातील चोरीतील मुद्देमाल केला जप्त

समर्थनगरातील चोरीतील मुद्देमाल केला जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देशिर्डीतून आणली गुन्ह्यातील मोटारसायकल : एकाने घराच्या पडक्या खोलीत आणि दुसऱ्याने शेतात लपविले होते सोने


औरंगाबाद : गुन्हे शाखेने समर्थनगरातील घरफोडीप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या मामा-भांजे टोळीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन गावांत लपविलेले सोने पोलिसांना काढून दिले. त्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल शिर्डीतून गुन्हे शाखेने ताब्यात घेतली असून, तीही चोरीची असल्याचे समोर आले.
समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमधील रहिवासी बँकेच्या अधिकारी सुनीता पुराणिक यांची सदनिका फोडून ५० तोळे दागिने व रोख असा एकूण १६ लाखांचा ऐवज पळविला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने किरण सोपान चव्हाण, कर्मा प्रकाश पवार, किशोर वायाळ आणि राजू इंगळे (बुलडाणा) या मामा-भांजेच्या टोळीला अटक केली होती.
कोठडीदरम्यान वायाळ व इंगळे यांनी गुन्ह्याची कबुली देऊन सोने काढून देण्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन दोन पोलीस पथके बुलडाण्याच्या दिशेने रवाना झाली होती. चोरीतील ऐवज चोरट्यांनी वाटे हिस्से करून वाटून घेतला होता. चोरट्यांनी हा ऐवज जमिनीत सुरक्षित पुरून ठेवला होता. एकाने पडक्या घरातून तर दुसºयाने शेतातून ऐवज पोलिसांना काढून दिला आहे. हा ऐवज घेऊन पोलीस पथक मंगळवारी सायंकाळी औरंगाबादकडे निघाले. त्यामुळे नेमका किती ऐवज पोलिसांच्या हाती लागला हे, समजू शकले नाही.
गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही चोरीची
जबरी हात मारून ज्या दुचाकीवरून चोरटे पसार झाले होते, ती दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. वायाळ आणि इंगळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून तीदेखील चोरीचीच असल्याचे निष्पन्न झाले, असे गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. टीमने शिर्डी येथे जाऊन मंगळवारी दुचाकी आणली आहे. ती कोठून चोरली, याचा आता तपास सुरू आहे.
दोन टीमने बुलडाण्यातून चोरीचा माल केला जप्त
सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, गजानन मांटे, विशाल सोनवणे, प्रभाकर राऊत, सुनील धात्रक यांच्या पथकाने आणि उपनिरीक्षक आफरोज शेख यांच्या पथकातील सुभाष शेवाळे, गजेंद्र शिंगाणे, सुधाकर राठोड, आश्रफ सय्यद, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे आदींनी चोरट्यांकडून माल हस्तगत केला.

Web Title: Sub-Saharan arrested for robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.