विषय समित्यांची निवडणूक थर्टीफर्स्टला

By Admin | Published: December 30, 2014 01:05 AM2014-12-30T01:05:54+5:302014-12-30T01:15:30+5:30

जालना : नगरपालिकेतील विषय समित्यांची निवडणूक २०१४ या वर्षाच्या सरत्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी होत आहे. संख्याबळानुसार पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व असले

Subject Committee election to ThirtyFurstall | विषय समित्यांची निवडणूक थर्टीफर्स्टला

विषय समित्यांची निवडणूक थर्टीफर्स्टला

googlenewsNext


जालना : नगरपालिकेतील विषय समित्यांची निवडणूक २०१४ या वर्षाच्या सरत्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी होत आहे. संख्याबळानुसार पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी एका पोटनिवडणुकीत मिळविलेल्या यशामुळे शिवसेनेनेही विषय समित्या ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कुणासोबत जाणार, हा संभ्रम मात्र कायम आहे.
काँग्रेसचे सर्व नगरसेवक माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाशी एकनिष्ठ असून अन्य पक्षांचेही काही नगरसेवक सोबत असल्याचा दावा या पक्षातील सदस्यांमधून केला जात आहे. विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी पक्षपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक काँगे्रससोबतच असल्याचे उपनगराध्यक्ष शाह आलमखान यांनी ठासून सांगितले. मनसे, बसपाचे व तीन अपक्ष नगरसेवकही काँगे्रसच्या बाजूला असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, विषय समित्यांच्या निवडीबाबत कोणाला पदे मिळणार, याबाबत सांगण्यास गोरंट्याल यांनी नकार दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले, शिवसेना व भाजपा सोबत सत्ताधारी पक्षातील नाराजांना ओढण्याचा प्रयत्न केला जाईल. काही अपक्षही आमच्या सोबत आहेत. नाराजीचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न आहेत.४
काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. राहुल हिवराळे व सभापती महावीर ढक्का यांनी शिवसेनेच्या ९ नगरसेवकांपैकी काही जण आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. ९ अपक्षांपैकी सर्वच काँगे्रस व राष्ट्रवादी सोबत आहेत. त्यामुळे विषय समित्यांवर काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचा दावाही त्यांनी केला.
४सध्या सभागृहात काँगे्रस २२, राष्ट्रवादी ७, शिवसेना ९, भाजपा ५, बसपा १, मनसे १, अपक्ष ९ असे एकूण ५४ नगरसेवक सभागृहात आहेत. काँगे्रसच्या बोरा यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.

Web Title: Subject Committee election to ThirtyFurstall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.