रस्ते व सिंचनासाठी भरीव तरतूद

By Admin | Published: March 20, 2016 12:30 AM2016-03-20T00:30:51+5:302016-03-20T00:43:53+5:30

जालना : राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे कृषी, रस्ते व सिंचासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद

Substantial provision for roads and irrigation | रस्ते व सिंचनासाठी भरीव तरतूद

रस्ते व सिंचनासाठी भरीव तरतूद

googlenewsNext


जालना : राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे कृषी, रस्ते व सिंचासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
शेतकरी जगला तर राज्याची अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकेल, यावेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्याचा विविध मार्गांनी विकास करण्यासाठी कृषी विभाग, रस्ते व सिंचन प्रकल्पासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात जालना जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले.
राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला. यावेळी जालना जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी, रस्ते व सिंचन प्रकल्पासाठी भरीव तरतूद आहे. रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत २०१६-१७ दरम्यान जालना भाटेपुरी परतूर रस्त्याची सुधारणा करणे एकूण तरतूद रूपये १०.२६ लाख, हट्टा-वळणी-शिवनगिरी रस्त्यासाठी रूपये ४७.३७ लाख, भोकरदन-जालना-रांजणी -परतूर-जांब - कुंभार पिंपळगाव-वडीगोद्री रस्त्याची सुधारणा करणे रु पये ३९.४७ लाख, वाटूर-जयपूर-वझसरकटे ते प्रजिमा-१२ रस्त्यांची सूधारणा करणे ६१.४३ लाख, सातोना - आष्टी रस्त्याच्या सुधारणेसाठी ३६.८६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Substantial provision for roads and irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.