बडकवस्ती शाळेचे नवोपक्रम स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:03 AM2021-01-03T04:03:26+5:302021-01-03T04:03:26+5:30
ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी खूप मर्यादा आहेत. मात्र, तरीही आमची अभ्यास साखळी या उपक्रमामार्फत शाळेने शिक्षण सुरू ठेवलेले आहेत. ...
ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी खूप मर्यादा आहेत. मात्र, तरीही आमची अभ्यास साखळी या उपक्रमामार्फत शाळेने शिक्षण सुरू ठेवलेले आहेत. शाळेतील उपक्रमशील शिक्षक विशाल टिप्रमवार यांनी हा नवोपक्रम सादर केला होता.
गेल्यावर्षीसुद्धा बडकवस्ती शाळेतील शाळा स्टुडिओ या उपक्रमाला जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया टिप्रमवार यांनी सहकार्य केले.
शाळेच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी दिलीप सिरसाठ, केंद्रीय मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, केंद्रप्रमुख शामराव फुसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण बडक, दत्ता बडक, संतोष कुदळे, सोमीनाथ खिल्लारे, ज्ञानेश्वर बडक, शिवाजी कुदळे, ऋषींदर तांदळे, बाळू बडक, मोईन मुलतानी, गोपाल राजपूत, धिरज खोकड, योगेश पवार, पुंगळे आदींनी अभिनंदन केले.