देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इंटर्नशालामध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:04 AM2021-07-11T04:04:46+5:302021-07-11T04:04:46+5:30
अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या सर्वंच महाविद्यालयांमध्ये इंटर्नशीप हा अभ्यासक्रमाचा भाग असून, प्रत्येक विद्यार्थ्याला इंर्टनशीप करणे अनिर्वाय आहे. महाविद्यालयातील २, ४३१ ...
अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या सर्वंच महाविद्यालयांमध्ये इंटर्नशीप हा अभ्यासक्रमाचा भाग असून, प्रत्येक विद्यार्थ्याला इंर्टनशीप करणे अनिर्वाय आहे. महाविद्यालयातील २, ४३१ विद्यार्थ्यांनी ४ हजार ३७ इंटर्नशिप संधीसाठी अर्ज केला होता. यात सर्वच विद्यार्थ्यांनी इंटर्नशीप पूर्ण केली आहे. यातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप काळात मानधनही देण्यात आल्याचे महाविद्यालयातर्फे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यासाठी प्रा. अमरसिंह माळी, समन्वयक प्रा. अमृता जोशी, प्रा. महेश बडमेरा, प्रा. बापीराव मारल्लापल्ले, प्रा. कविश पटवारी यांच्यासह महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिउरकर, विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. राजेश औटी, डॉ. सुनिल शिंदे, प्रा. प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, प्रा. रुपेश रेब्बा,अच्युत भोसले आदींनी परिश्रम घेतले.