...असा असणार महामॅरेथॉनसाठी धावण्याचा मार्ग; शालेय विद्यार्थी वाढवणार धावपटूंचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 01:52 PM2023-12-16T13:52:09+5:302023-12-16T13:53:54+5:30

धावण्याच्या मार्गावर होणार झुम्बा डान्स, संगीत, लेझीम, ढोल, भजने

...such shall be the route of running for the Mahamarathon; School students will boost the enthusiasm of the runners | ...असा असणार महामॅरेथॉनसाठी धावण्याचा मार्ग; शालेय विद्यार्थी वाढवणार धावपटूंचा उत्साह

...असा असणार महामॅरेथॉनसाठी धावण्याचा मार्ग; शालेय विद्यार्थी वाढवणार धावपटूंचा उत्साह

छत्रपती संभाजीनगर : १७ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुलावर लोकमत महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे. ही मॅरेथॉन २१, १०, ५ आणि ३ कि.मी. अशा विविध अंतरात व मार्गावर होणार आहे. चैतन्यपूर्ण वातावरणात होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी धावणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करणार आहेत. महामॅरेथॉनच्या मार्गादरम्यान १८ शाळांतील विद्यार्थी लेझीम, ढोल, नृत्य, झुम्बा डान्स, फ्लॅग ड्रिल, पोम पोम ड्रिल, संगीत आणि गाण्याद्वारे नागरिक धावपटूंना प्रोत्साहित करणार आहेत.

धावपटूंना प्रोत्साहित करणाऱ्या शाळांमध्ये कलावती चौहान हायस्कूल, किड्स कॅपिटल, सेंट मीरा, सेंट लॉरेन्स हायस्कूल, अल हुदा, सेंट लॉरेन्स सेमी इंग्लिश हायस्कूल, रिव्हड डेल हायस्कूल, समता दर्शन स्कूल, सिद्धार्थ इंटरनॅशनल, व्ही. आर. स्कॉलरडेन, द वर्ल्ड स्कूल, देवगिरी ग्लोबल स्कूल, सेंट जोन्स हायस्कूल, इंडोब्रेन प्रीस्कूल, नॅशनल इंग्लिश स्कूल, द जैन इंटरनॅशनल, न्यू रेडियंट स्कूलचा समावेश आहे. तसेच गजानन मंदिर येथे भजनी मंडळही धावपटूंना धावण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.

आज बिब एक्स्पो
१७ डिसेंबर रोजी रंगणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी आज शनिवारी (दि. १६) बिग एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत भवन येथील हॉलमध्ये या एक्स्पोला सुरुवात होणार आहे. यादरम्यान लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना रनर किट दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिक, धावपटूंनी बिब एक्स्पोला येताना शुल्क भरल्याची पावती दाखवून आपला रनर किट घेऊन जावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

...असा असणार महामॅरेथॉनसाठी धावण्याचा मार्ग
२१ कि. मी. :
विभागीय क्रीडा संकुल, मृगनयनी हॉटेल, के-पाँड चौक, गजानन महाराज मंदिर, क्युबा रेस्टॉरंट, यशोदीप हॉटेल, एशियन हॉस्पिटल, हॉटेल ग्लोबल, क्रांती चौक, स्वाद रेस्टॉरंट, गव्हर्न्मेंट इंजिनअरिंग कॉलेज, जय टॉवर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन सुविधा केंद्र, हॉटेल व्हिट्स, देवगिरी महाविद्यालय, भाजीवाली बाई चौक, इन्डोब्रेन प्री स्कूल, दर्गा चौपाटी, रेमंड शोरूम आणि पुन्हा त्याच मार्गाने. समारोप विभागीय क्रीडा संकुल.

१० कि. मी. : विभागीय क्रीडा संकुल, के-पाँड चौक, गजानन महाराज मंदिर, क्युबा रेस्टॉरंट, सेव्हन हिल्स, एशियन हॉस्पिटल, हॉटेल ग्लोबल, क्रांती चौक, स्वाद रेस्टॉरंट, जय टॉवर, गोल्डी थिएटर, हॉटेल व्हिट्स, भाजीवाली बाई चौक, दर्गा चौपाटी. समारोप : विभागीय क्रीडा संकुल.

०५ कि. मी. : विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, के-पाँड चौक, सेव्हन हिल चौकापासून वळून पुन्हा परतीच्या मार्गाने गजानन महाराज चौक व समारोप विभागीय क्रीडा संकुल.

३ कि. मी. : विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, के-पाँड चौक, गजानन महाराज मंदिरापासून वळून पुन्हा त्याच मार्गाने. समारोप : विभागीय क्रीडा संकुल.

Web Title: ...such shall be the route of running for the Mahamarathon; School students will boost the enthusiasm of the runners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.