रेशीम लागवडीला सुगीचे दिवस

By Admin | Published: November 18, 2014 12:32 AM2014-11-18T00:32:35+5:302014-11-18T01:07:42+5:30

शिरीष शिंदे ,बीड पिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती.

Sugar Cultivation Day of Sugarcane | रेशीम लागवडीला सुगीचे दिवस

रेशीम लागवडीला सुगीचे दिवस

googlenewsNext


शिरीष शिंदे ,बीड
पिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती. यावर्षी या क्षेत्रात उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १५ नोव्हेंबर पर्यंत ३३० वर जाऊन पोहोचली आहे. ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. विशेष, म्हणजे बेरोजगार युवकही रेशीम उद्योग करु शकत असल्याने हा उद्योग जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
जिल्ह्यात गेल्या चार वर्षांच्या कालावधीत फारसा पाऊस झाला नाही. एक वर्षापुर्वी दुष्काळ पडल्याने अनेक ठिकाणी पिके उगवूच शकली नाहीत. त्या पाठोपाठ गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास निर्सगाने ओढून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. एकंदरीत शेती व्यवसाय हा संकटात सापडला आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी विविध व्यवसाय करीत आहे. त्यात दुग्ध व्यवसाय, शेळी पालन यासारखे व्यवसाय करीत आहे. मात्र हे व्यवसायही अडचणीत आल्याने आता शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आहेत.
रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचा चांगले उत्तपन्न मिळत असल्याने या व्यवसायात उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तुतीची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना रेशिम आळीपासुन उत्पादन मिळत आहे. बीड येथील रेशीम कार्यालया मार्फत शेतकऱ्यांना रेशीम कोष बनविणाऱ्या आळ्यांची अंडी अनुदानस्वरुपात दिली जातात. त्यानंतर कोष निर्मिती झाल्यानंतर रेशीमला चांगला भाव मिळतो. जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत तयार झालेला कोष विकत घेतला जातो मात्र त्याचा भाव कमी असल्याने शेतकरी बँगलोर येथे रेशिमची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Sugar Cultivation Day of Sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.