अजिंठा घाटात साखरेचा सडा; चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 19:04 IST2023-05-25T19:04:38+5:302023-05-25T19:04:52+5:30
साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक अजिंठा घाटात कोसळून मोठे नुकसान

अजिंठा घाटात साखरेचा सडा; चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला
सिल्लोड: गेवराईहून मध्यप्रदेशकडे साखर घेऊन जाणारा मालट्रक अजिंठा घाटाच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोसळला. या अपघातात चालक व वाहक दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान होऊन दरीत साखर अस्तव्यस्त पडली आहे.
गेवराईहून मध्यप्रदेश येथील हरदा येथे साखर भरून जाणारा मालट्रक (एमपी ०९ एचएफ ८८१७ ) आज सकाळी अजिंठा घाटातून जात होता . घाटातील एका वळणा चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. यात चालक कचरुमल राठोड व वाहक सुनोजय कर्मा ( दोघे रा. मध्यप्रदेश) हे जखमी झाले. त्यांच्यावर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.