वसमत येथे हार्वेस्टर मशीनसह ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:34 PM2017-11-10T23:34:20+5:302017-11-10T23:34:28+5:30
शिवारात हार्वेस्टर मशीनने ऊस काढणीचे काम सुरू असताना अचानक मशीनने पेट घेतला. या आगीमुळे ऊसाचा फडही पेटला. पाहता पाहता ३ एकर ऊस व हार्वेस्टर मशीन जळून खाक झाली. यात किमान १ कोटीच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : शिवारात हार्वेस्टर मशीनने ऊस काढणीचे काम सुरू असताना अचानक मशीनने पेट घेतला. या आगीमुळे ऊसाचा फडही पेटला. पाहता पाहता ३ एकर ऊस व हार्वेस्टर मशीन जळून खाक झाली. यात किमान १ कोटीच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील रहिवाशी जयराम जाधव यांच्या वसमत शिवारातील सर्वे नं. २४०- १- क मधील ऊस काढणीचे काम सुरू होते. हार्वेस्टर मशीनने ऊस काढत असताना शुक्रवारी दुपारी अचानक मशीनने पेट घेतला. आग लागताचा ऊसही पेटला व आगीत मशीन व ३ एकर ऊस जळाला. मशीन चालक बाळू जाधव हा किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिसात आकस्मीत जळीत प्रकरणी हरिचंद्र जयराम जाधव यांच्या दिलेल्या माहितीवरून नोंद घेण्यात आली आहे. घटनास्थळी पोना ए.एम. नायसे यांनी भेट देवून पंचनामा केला. हार्वेस्टर मशीन आगीत खाक झाली आहे. मशीन व ऊस जळाल्याने किमान ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतरच नुकसानीचा प्रत्यक्ष आकडा स्पष्ट होणार असला तरीही शेतकºयाचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. निदान नुकसान भरपाई तरी मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.