नैराश्यातून उच्चशिक्षित अभियंत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:04 AM2021-09-12T04:04:57+5:302021-09-12T04:04:57+5:30

देवेंद्र याने बी. टेकपर्यंत शिक्षण घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून तो घरीच होता. कुटुंबीयांशी वाद असल्याने तो एकटाच हनुमाननगरात ...

Suicide of a highly educated engineer out of depression | नैराश्यातून उच्चशिक्षित अभियंत्याची आत्महत्या

नैराश्यातून उच्चशिक्षित अभियंत्याची आत्महत्या

googlenewsNext

देवेंद्र याने बी. टेकपर्यंत शिक्षण घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून तो घरीच होता. कुटुंबीयांशी वाद असल्याने तो एकटाच हनुमाननगरात किरायाने खोली घेऊन राहत होता, तर त्याचे आई-वडील हर्सूल परिसरात किरायाच्या खोलीत राहतात. दरम्यान, शनिवारी देवेंद्र दिसत नसल्याने त्याचा भाऊ हनुमाननगरात आला. त्यावेळी त्याने देवेंद्रला आवाज दिला. मात्र, खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी देवेंद्रने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तत्काळ पुंडलिकनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याला फासावरून खाली उतरवत बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्याच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicide of a highly educated engineer out of depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.