गळफास घेऊन मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:04 AM2021-04-20T04:04:16+5:302021-04-20T04:04:16+5:30
औरंगाबाद : नैराश्यातून मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बंबाटनगरमध्ये १७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ...
औरंगाबाद : नैराश्यातून मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बंबाटनगरमध्ये १७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुलाब रमेश त्रिकाळ (२९) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह गुलाब हे करत. कोरोनाचे संकट आल्यापासून त्यांना नियमित काम मिळत नव्हते. त्यांचे आई-वडील वॉचमन म्हणून काम करतात आणि तेथेच राहतात. त्यांचा लहान भाऊ आळंदी येथे कंपनीत कामाला आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १७ एप्रिल रोजी घरात कोणीही नसताना गुलाब यांनी छताच्या पाईपला कपड्याने बांधून गळफास घेतला. हा प्रकार समोर येताच त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांची सुसाईड नोट पोलिसांना सापडली. या नोटमध्ये त्यांनी त्यांच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असे नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुंडलिकनगर ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक जगदीश चव्हाण तपास करत आहेत.