प्रेमीयुगुलाची वैजापुरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:45 AM2018-07-04T00:45:08+5:302018-07-04T00:45:54+5:30

मुलीला लग्नासाठी स्थळ येत असल्याने प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना वैजापूर तालुक्यातील खंबाळा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

 Suicide lover of love lover | प्रेमीयुगुलाची वैजापुरात आत्महत्या

प्रेमीयुगुलाची वैजापुरात आत्महत्या

googlenewsNext

वैजापूर : मुलीला लग्नासाठी स्थळ येत असल्याने प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना वैजापूर तालुक्यातील खंबाळा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सागर राहुल म्हैसमाळे (२२) व साक्षी बाबासाहेब शेजवळ (१८), अशी त्यांची नावे असून, ते दोघेही जांबरगावचे रहिवासी होते. साक्षी ही विनायकराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती व सागर हा चप्पल विक्रीचा व्यवसाय करीत होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता; पण घरच्यांकडून या लग्नाबाबत चालढकल होत होती. त्यातच साक्षीला पाहण्यासाठी स्थळ येत असल्याने आपले लग्न होणार का, याबाबत प्रेमीयुगुल चिंतातुर होते. साक्षीला तिच्या वडिलांनी सोमवारी दुपारी कॉलेजमधून घरी आणले. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. घरच्यांनी शोध घेतला; पण ती सापडली नाही. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास लाडगाव रस्त्यावर रोठी वस्तीजवळच्या खंबाळा शिवारातील लिंबाच्या झाडाला एकाच ओढणीने गळफास घेतलेले दोघांचे मृतदेह आढळून आले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, गुणवंत थोरात, पोलीस नाईक संजय घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस पाटील अर्जुन साठे यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार एस.के. धादवड हे करीत आहेत.
तरुण वर्गात खळबळ
स्वामी समर्थनगर भागात राहणारी मयुरी अशोकराव चव्हाण (२१) या तरुणीने पाच दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना मंगळवारी खंबाळा शिवारात पुन्हा प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याने तरुण वर्गात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तरुणी वैजापूर शहरातील एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. या दोन्ही घटनांत गळफास घेताना ओढणीचा वापर करण्यात आल्याने नेमका प्रकार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title:  Suicide lover of love lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस